आई-वडिलांच्या सेवेतच जीवनाचे सार्थक

चिंबळी- तरूण पिढीने कुठल्याही व्यसनाला बळी पडू नये. तसेच आई- वडिलांची नियमितपणे मनापासून सेवा केल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे मत हभप बळीराम महाराज मेहूणकर यांनी व्यक्‍त केले.
चिंबळीतील पद्मावतीनगर येथे सावता महाराज मंदिरात विठ्ठल-रुख्मणी व सावता महाराज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाणच्या 42 व्या वर्धापन दिनानिमत्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे व किर्तन सोहळ्यानिमित्त हभप बळीराम महाराज मेहूणकर बोलत होते. यावेळी पद्मावती तरुण मंडळाचे अध्यक्ष समीर बनकर, उपाअध्यक्ष अमित बटवाल, पांडुरंग बनकर, हभप सुभाष कातोरे, सोपान ताम्हाणे, रंगनाथ बनकर, रामचंद्र कातोरे, कुंडलिक बनकर, काळूराम बनकर, रामचंद्र बनकर, वसंत जाधव, दत्तात्रय कातोरे, बाबासाहेब बनकर, अर्जुन बनकर, चंद्रकात जगनाडे, राजू विधाटे, गुलाब सातव ज्ञानेश्‍वर बनकर, दत्तात्रय बनकर, श्रीकांत बनकर, शिवाजी बनकर, बाजीराव बनकर आदि मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, या सोहळ्यानिमित्त रोज पहाटे 4 ते 6 काकड आरती महापूजा, सकाळी 8 ते 11 ज्ञानेश्‍वरी पारायण, दुपारी 12 ते 2 महिला भजन व 3 ते 6 ज्ञानेश्‍वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 सामुदायिक हरिपाट, रात्री 8 ते 10 किर्तनसेवा व त्यानंतर महाप्रसाद व संगीत भजनाचा हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हभप प्रेरणाताई जढर (बालकिर्तनकार आळंदी), रामेश्‍वर जाधव (देहू), सचिन चकवे (जुन्नर), बळीराम महाराज मेहूणकर (आळंदी) तर रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 12 हभप पांडुरंग महाराज साळुंखे (सांगली) यांच्या काल्याच्या किर्तनसेवेने व महाप्रसादानाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मावती भजनी मंडळ, पद्मावती तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)