आई आपला पहिला गुरू – मुख्याध्यापक मेंगावडे

राजेगाव- आपल्या जीवनात पहिला गुरू आई, त्यानंतर दुसरा गुरू शिक्षक आहे. ते आपल्याला ज्ञान देतात, आपल्या आयुष्यातील जगण्याचा मार्ग सांगतात. म्हणून आपण त्यांना वंदन केले पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, असे संबोधन मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे केले. राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगताना ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय गुरू-शिष्य परंपरेचे आणि मूल्यांचे महत्त्वही समजून देण्यात आले. स्वयंसेविका प्रियांका साळवे आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प, श्रीफळ आणि प्रतिमा देऊन सन्मानित केले. यावेळी आणि प्रियांका साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण लोंढे, राजेश राऊत, सचिन खैरे, सोपान चोपडे, अमोल मोघे, शहाजी गुणवरे, अरुण भोई, गणेश भोई, जनार्दन भोई, राजेंद्र बोंद्रे, विशाल लोंढे, अमोल इंदलकर, विठ्ठल मोघे, अतुल काळदाते आदि उपस्थित होते. यावेळी सतिश हाके यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)