आंब्याच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर जप्त

सातारा वनविभागाची धडक कारवाई

सातारा – मौजे खोडशी गावच्या हद्दीत सातारा- कराड रस्त्यावर चांद कादर आगा रा. गोटे ता. कराड हे विनापरवाना आंबा प्रजातीच्या जळावू लाकूड मालाची ट्रॅक्‍टर क्रमांक चक11 ण 3660 मधून वाहतूक करीत असल्याचे आढळल्याने गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारतीय वन अधिनियम,1927 चे कलम 41 2(ब) व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार हा गुन्हा असून या प्रकरणात सुमारे अंदाजे 3.10 लाख रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरील कारवाई डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक सातारा, प्रकाश बागेवाडी,विभागीय वन अधिकारी, दक्षता, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गवारे, वन परीक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, सातारा, गजानन भोसले, वनपाल, दीपक गायकवाड़, विजय भोसले, वनरक्षक; सुहास पवार, राजेश वीरकर, पोलीस हवालदार, दिनेश नेहरकर, वाहनचालक यांच्या सहकार्याने पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)