आंबेगाव तालुक्‍यात आठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के

गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन ः बारावीच्या विविध शाखांत विद्यार्थ्यांनी मिळवले यश

मंचर -आंबेगाव तालुक्‍यात इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण 22 महाविद्यालयांपैकी 8 महाविद्यालयांचा विविध शाखांचा 100 टक्के निकाल लागला. तालुक्‍यातून एकूण 2856 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 2660 विद्यार्थी पास झाले असून, तालुक्‍याचा निकाल 93.23 टक्के लागला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारावीच्या परीक्षेसाठी मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील सायन्य विभागामध्ये एकूण 153 विद्यार्थी पास झाले. त्यांचा निकाल 99.34 टक्के लागला. कला विभागामध्ये 284 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांचा निकाल 87.67 टक्के लागला, तर वाणिज्य विभागामध्ये 215 विद्यार्थी होते, त्यांचा निकाल 95.81 टक्के लागला.

महात्मा गांधी विद्यालय, मंचरमधील विज्ञान विभागाचाचा निकाल 100 टक्के लागला. घोडेगाव येथील जनता विद्या मंदिरमध्ये विज्ञान विभागात 81.45 टक्के, कला विभाग86.91 टक्के तर वाणिज्य विभागाचा निकाल 93.15 टक्के लागला. श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज धामणी विद्यालयात सायन्स विभागाचा निकाल 91.11 टक्के लागला. श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज अवसरी खुर्द या विद्यालय विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला. एचएससी वॉक विभागाचा निकाल 92.59 टक्‍के लागला. श्री भैरवनाथ विद्याधाम हायर सेकंडरी स्कूल आंबेगाव कला विभागाचा निकाल 70.37 टक्‍के, वाणिज्य विभागाचा निकाल 83.33 टक्के लागला. हुतात्मा बाबू गेणु ज्युनिअर कॉलेज महाळुंगे पडवळ विज्ञान विभागाचा निकाल 98.18 टक्के लागला आहे. नरसिंह विद्यालय व ज्युनिअर कॉलेज रांजणी वाणिज्य विभागाचा निकाल 93.10 टक्‍के लागला. श्री. टी. एस. बोऱ्हाडे ज्युनिअर कॉलेज, शिनोली सायन्स विभागाचा 100 टक्के, कला विभागाचा निकाल 96.03 टक्के लागला. निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात कला विभागाचा निकाल 53.33 टक्के लागला. श्री मुक्‍तादेवी विद्यालय ज्युनिअर कॉलेज नारोडी महाविद्यालयाचा निकाल 95.83 टक्के लागला. श्रीमान निवृत्तीशेठ दाजी पवळे ज्युनिअर कॉलेज पेठ विज्ञान विभागाचा निकाल 82.14, कला विभागाचा निकाल 92.72, तर कॉमर्स विभागाचा निकाल 98.01 टक्के लागला.

श्री पंढरीनाथ विद्यालय, पोखरी निकाल 96.66 टक्के, गव्हर्नमेंट सेकेंडरी आणि हायर सेकेंडरी आश्रमशाळा, गोहे बुद्रुक विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के, कला विभागाचा निकाल 100 टक्के लागला. श्री भैरवनाथ विद्यालय ज्युनिअर कॉलेज, शिंगवे विज्ञानचा निकाल 100 टक्के लागला. विद्या विकास मंदिर, अवसरी बुद्रुक 100 टक्‍के निकाल. कमजलादेवी विद्यालय, कळंबचा निकाल 53.12 टक्के. संगमेश्‍वर माध्यमिक आणि बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक, पारगाव शिंगवे विज्ञान विभागाचा 98.14, कला विभाग 100 टक्के तर वाणिज्य विभागाचा निकाल 99.08 टक्के लागला आहे. शिवशंकर विद्यालय ज्युनिअर कॉलेज, तळेघरचा निकाल 73.91 टक्के लागला. डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ऍन्ड सायन्स, आंबेगावचा निकाल 98.48 टक्के लागला. दत्तात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव कारखाना येथील विज्ञानचा निकाल 100. वाणिज्य विभागाचा 97.14 टक्के निकाल लागला. जनता विद्यामंदिर घोडेगावचा निकाल 95.65 टक्के निकाल लागला.
मंचर येथील ओम इलेक्‍ट्रो येथील संगणक केद्रावर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रत मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संगणक केद्राचे संचालक संदेश उर्फ प्रदीप लोंढे यांनी दिली.

100 टक्के निकाल लागलेली महाविद्यालये
महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज मंचर, श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज – अवसरी खुर्द, श्री. टी. एस. बोऱ्हाडे ज्युनिअर कॉलेज – शिनोली, गोव्हर्नमेंट सेकडरी ऍण्ड हायर सेकंडरी आश्रम शाळा – गोहे बुद्रूक, श्री भैरवनाथ विद्यालय ज्युनिअर कॉलेज – शिंगवे, विद्या विकास मंदीर – अवसरी बुद्रुक, संगमेश्‍वर माध्यमिक व बाबुराव गेणु ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालय – पारगाव (शिंगवे), दत्तात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय – पारगाव कारखाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)