आंबेगावात 800 एकरातील फ्लॉवर पीक धोक्‍यात

मंचर-फ्लॉवरला मिळणारा बाजारभाव आणि हवामानाची साथ मिळत नसल्याने फ्लॉवर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. फ्लॉवरला 10 किलोसाठी 80 ते 110 रुपये बाजारभाव मिळत आहे. पावसाळी वातावरणामुळे फ्लॉवर पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्‍यात पावसाळी हंगामात फ्लॉवरचे मोठे उत्पादन घेतले जाते. सुमारे 800 एकर क्षेत्रात फ्लॉवरचे पिक असल्याचे कृषी विभागाने सांगितले. गेल्या एक महिन्यापासून पावसाळी वातावरण असल्याने फ्लॉवर पिकावर किडीचा प्रादूर्भाव वाढत आहे. चांगल्या प्रतीची फ्लॉवर बाजारात विक्रीसाठी येत नसल्याचे व्यापारी बांधवांनी सांगितले. हवामान खराब आहे, त्याचा परिणाम फ्लॉवर पिकावर होत असून 50 ते 60 दिवसांत लागवडीनंतर फ्लॉवर काढणीचे काम पूर्ण होते. तसेच बाजारभावाची साथ मिळाली तर चांगले पैसे होतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

  • मंचर बाजार समितीत दररोज सुमारे 600 ते 800 डाग फ्लॉवरची आवक होते; परंतु फ्लॉवरवर किडीचा प्रादुर्भाव असल्याने ग्राहकांकडून फ्लॉवरची मागणी नाही.
    -बाबाजी पोखरकर, हेमंत पोखरकर, शेतकरी
  • सध्या फ्लॉवर काढणीची कामे प्रगतीपथावर आहे. फ्लॉवरची आवक जास्त; परंतु गिऱ्हाईक कमी असल्याने बाजार भावात घसरण झाली आहे.
    -ठकसेन हिंगे पाटील, व्यापारी मंचर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)