आंबेगावचे सर्वाधिक मतदान कोणाला पावणार

मंचर- शिरुर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 70.52 टक्‍के मतदान झाले. आता ऐवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले मतदान कोणत्या उमेदवाराला पावणार याकडे मतदारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील रहिवाशी आहेत.तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे शेजारील जुन्नर तालुक्‍यातील आहेत; परंतु त्यांच्या प्रचाराचे नियोजन मंचर येथून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. शिरुर लोकसभा मतदारसंघात एकुण मतदार 21 लाख 73 हजार 348 आहेत. त्यापैकी 12 लाख 92 हजार 391 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. सुमारे 59.46 टक्‍के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून 70.29 टक्‍के मतदान झाले. त्याखालोखाल जुन्नर विधानसभा मतदारसंघ 64.90 टक्‍के, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ 62.76 टक्‍के, शिरुर विधानसभा मतदारसंघ 61.52 टक्‍के, भोसरी विधानसभा मतदारसंघ 57.48 टक्‍के, हडपसर मतदारसंघ 47.84 टक्‍के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक झालेले मतदान कोणास पावणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 23 मे रोजी शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतदानाची मोजणी होणार असून मतदारांचा कौल स्पष्ट समजणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.