आंदर मावळातील आंद्रा धरण शंभर टक्‍के भरले

टाकवे बुद्रुक – मागील अनेक दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरण पूर्ण भरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे कालपर्यंत धरण परिसरात 636 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

तीन टीएमसी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या धरणात आजअखेर जलाशयाची पातळी 614 मीटर आहे. जलाशयाची पातळी वाढली की, सांडव्यावरून विसर्ग सुरू होतो. धरणात एकूण पाणीसाठा 83.30 टक्‍के दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी उपयुक्‍त साठा 82.74 दशलक्ष घनमीटर आहे. आंद्रा धरणाचे उपअभियंता अनंता हांडे यांनी ही माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव अद्याप लालफितीत अडकून पडला आहे. तर 20 वर्षांपासून धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न शासन दरबारी धूळखात पडले आहेत. त्यात या धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची भूमिका शासनाने स्पष्ट केल्यावर धरणग्रस्तांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)