अहिल्याबाई होळकरांच्या विचारानेच महिलांची प्रगती

तळेगाव दाभाडे – राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर या लढवय्या शूरवीर होत्या. त्यांच्या विचारानेच महिलांची प्रगती होईल. महिलांना पन्नास टक्के आरक्षण असून महिलांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या सभागृहात गुरुवार (दि.31) सकाळी 11:30 वा. राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांच्या 293 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक संदीप शेळके, अमोल शेटे, काजल गटे, वैशाली दाभाडे, नितीन पोटे, हनुमंत पोटे, जयवंत कवितके, सुहास गरुड, एकनाथ बुळे, तुकाराम भोजने, अरुण धालपे, रंगनाथ कुळाल, दादासाहेब कुचेकर, निर्मला पोटे, कृष्णा चौघुले, ऋषिकेश भोजने, सुदाम भेगडे, कौतिकराव गडकर, विश्वनाथ बिराजदार आदि उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेळके पुढे म्हणाले अहिल्याबाई यांचा आदर्श घेतल्यासच आदर्श पिढी उदयास येईल. महिला प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक अमोल शेटे, निर्मला पोटे, आदींनी मनोगतातून होळकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत पोटे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास गरुड यांनी केले. आभार नितीन पोटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)