अहल्यादेवी राज्यकर्त्या, उत्तम प्रशासक

सुनील वीरकर : अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धनगरवाडीत मिरवणूक
सोनई – अहल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाच्या युवकांनी कार्य करावे. अहल्यादेवी होळकर या धनगर समाजासाठी एक आदर्शवत स्त्री होऊन गेल्या. धनगर समाजाचे श्रद्धास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्या राज्यकर्त्या व उत्तम प्रशासक होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी उत्तम राज्यकारभार केला. येथून पुढे येणारी प्रत्येक जयंती धुमधडाक्‍यात साजरी करण्यासाठी धनगर समाजातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वीरकर यांनी केले.
नेवासे तालुक्‍यातील सोनईजवळील धनगरवाडी येथे पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांची 293 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. होळकर यांच्या प्रतिमेची भावातून मिरवणूक काढण्यात आली होती.
अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धनगरवाडी येथे राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन मुळा कारखान्याचे संचालक कारभारी डफाळ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील विरकर होते. या वेळी विष्णू महाराज पिठोरे, पत्रकार बाळासाहेब शेटे, अशोक भुसारी, अहल्यादेवी सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर पाटील वीरकर व संचालक मंडळ, बाबासाहेब गावडे, रावसाहेब नाचण, हरिभाऊ ढाले, विजय डोईफोडे, भाऊसाहेब दातीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी निखिल वीरकर, प्रकाश डोईफोडे, नितीन नाचण, बबन वीरकर, भाऊराव वीरकर, भाऊराव दातीर, पोपट वीरकर आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)