अहमदनगर: होळकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिघांवर जिल्हा बंदी

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील चोंडी येथे होणाऱ्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुवस्था राखण्यासाठी रवी देशमुख ,डॉ इंद्रकुमार भिसे ,सूर्यकांत कांबळे या तिघांवर उपविभागीय दंडाधिकारी अर्चना इष्टे यांनी जिल्हाबंदीची कारवाई करण्यात आली आहे.

चोंडी येथे होणाऱ्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती निमित्त लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ,खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहे ,याबाबत उमापूर जि बीड येथील रवी रावसाहेब देशमुख हे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी दि 31 रोजी चोंडी येथे आमरण उपोषण करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर डॉ इंद्रकुमार देवराव भिसे हे चोंडी येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणार आहे त्यांना यापूर्वी कायदा सुव्स्थतेच्या दृष्टिकोनातून जयंती साजरी करण्याची परवाग्नी नाकारण्यात आली होती. तसेच भिसे यांना प्रशासनाने कलम 149 अंतर्गत नोटीसहि वाजविण्यात आली होती. मात्र डॉ भिसे हे जयंती कसल्याही परिस्थितीत साजरी करण्याचे पत्रकही प्रसिधद करण्यात आले होते.

वरुड जि उस्मानाबाद येथील र्सुर्यकांत चंद्रकांत कांबळे यांनी 2017 च्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात धनगर समाजाचे आरक्षण संधर्भात पालकमंत्री राम शिंदे यांच्या समोर घोषणाबाजी केली होती या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या अहवालानंतर या तिघांवर उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे यांनीफौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 (2) अन्व्ये दि 30. 05. 2018 पासून ते 31. 05.2018पर्यंत एक दिवसासाठी जामखेड तालुक्‍यात तसेच अहमदनगर जिल्यात प्रवेश करण्यास बंद घालण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ इंद्रकुमार भिसे यांनी कालच जामखेड येथे पत्रकार परिषद घेऊन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व समाजाच्या प्रेरणास्थान आहेत त्याची जयंती सर्व साजरी करू शकतात असे असताना पालकमंत्री प्रा.राम शिंदे हे होणारी जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न प्रशासनाला हाताशी धरून करत असल्याचा आरोप करत हे आम्ही कदापिही सहन करणार नाही बहुजन समाज्याच्या वतीने पुण्यश्‍लोक आहील्यादेवींची जयंती ही आम्ही चौंडी येथेच साजरी करणार आहोत.या साठी आम्हाला जेल मध्ये बसण्याची वेळ आली तरी चालेल असा इशारा दिला आहे यामुळे प्रवेश बंदी असतानाही भिसे हे जयंती साजरी करण्यासाठी येणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मेजेस वायरल झाले आहे त्यामुळे पोलीस प्रशासने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त चोंडी येथे तैनात केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)