अहमदनगर: साईचरित्र ग्रंथाची अव्वाच्या सव्वा दरात विक्री

प्रशासनाची डोळेझाक..
साईचरित्र ग्रंथ साईबाबा संस्थानकडून 20 टक्के सूट देऊन केवळ शंभर रुपयांच्या आसपास विक्री केला जातो. मात्र, आंतरराष्ट्रीय कंपन्या चारपट किंमत आकारून भक्तांची लूट करीत आहे. संस्थानकडे कॉपीराईट आहे. मग, कंपन्याकडे ग्रंथ विक्रीस कसे? याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे का, असा सवाल परदेशी भाविक करीत आहे. साईबाबा संस्थानकडे कर्मचाऱ्यांची कमी नाही, ना यंत्रणेची; शिवाय शिर्डीत फास्ट कुरिअर सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. असे असताना या ऑनलाइन कंपन्यांनी पवित्र अशा साईचरित्र ग्रंथाचा बाजार मांडून भाविकांची लूट सुरू केली आहे. यास आळा कधी बसेल, अशी चर्चा ग्रंथ वाचकांमध्ये आहे.

राजकुमार जाधव

आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून साईभक्‍तांची आर्थिक लूट
साई संस्थान याबाबत अनभिज्ञ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिर्डी – कै. गोविंद दाभोलकर लिखित साईचरित्र ग्रंथ आता विविध 16 भाषेत साईबाबा संस्थानने प्रकाशित केला आहे. त्यापैकी 13 भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांचे हक्‍क साईबाबा संस्थानकडे अबाधित आहेत. त्याबरोबर देश-विदेशातील भाविकांना संस्थानने साईचरित्र ग्रंथाच्या विक्रीवर 20 टक्के सूट दिली आहे. मात्र, ऑनलाइन कंपन्यांकडून या साईचरित्र ग्रंथाची अव्वाच्या सव्वा दराने ऑनलाइन पद्धतीने विक्री करून भाविकांची सर्रास लूट केली जात आहे.

जगभर साईबाबांचा प्रसार आणि प्रचार होत आहे तो मग साईचरित्र ग्रंथातील बाबांच्या लीला असो, वा चमत्कार या माध्यमातून साईच्या कार्याची महती जगभरात झपाट्याने पोहोचत आहे. साईबाबा विश्वस्त व्यवस्थेने साईचरित्र ग्रंथाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, तेलगू, तमिळ, सिंधी, बंगाली, उर्दू, ओरिया, पंजाबी, नेपाळी, मल्याळम, कोंकणी, आसामी अशा 16 भाषेत आवृत्या प्रकाशित केल्या आहेत. दरम्यान, या पैकी 13 भाषेतील पुस्तकांचे कॉपीराईट साईबाबा संस्थानकडे आहे. शिर्डी मुख्य कार्यालयातून देश-विदेशातील भाविकांना ऑनलाइन तसेच जशी मागणी असेल त्याप्रमाणे ग्रंथ विक्रीच्या 20 टक्के दरात सूट देऊन विक्री केली जात आहे.

सध्या साईसमाधी शताब्दी वर्ष सुरू असल्याने साईचरित्र ग्रंथाला मोठी मागणी आहे. यामध्ये तेलगू भाषिक साईचरित्र ग्रंथाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समजते. मात्र, काही ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कंपन्या या ग्रंथाची अव्वाच्या सव्वा किंमत आकारून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फ्लिपकार्ड, ऍमेझॉन, स्नेपडील, मायांत्रा अशा कंपन्यांचा सहभाग आहे. यासंबंधी प्रकाशन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, साईचरित्र ग्रंथ पुस्तक विक्रीसाठी साईबाबा संस्थानची स्वतंत्र वेबसाइट असून, देश- विदेशातून जशी मागणी असेल त्याप्रमाणे ग्रंथ पोस्टाने पाठविण्यात येतो. मात्र, कोणत्याही ऑनलाइन कंपनीशी करार केला नसल्याचे त्यांनी सांगून याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)