अहमदनगर: संजीवनी शिक्षण संस्थेचे केंद्र ठरेल मार्गदर्शक

दत्तात्रय शिंदे : नेवासा येथे मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन

नेवासा – तालुकास्तरावर प्रथमच व्यावसायिक शिक्षणासाठी कोपरगावच्या संजीवनी शिक्षण संस्थेने सुरु केलेल्या मार्गदर्शन केंद्र पालक आणि विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. असे मत शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोपरगाव येथे संजीवनी शिक्षण संस्थेने नेवासा येथे सुरु केलेल्या मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी नितीन कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. तर प्राध्यापक देविदास साळुंके,नानासाहेब पवार हे प्रमुख उपस्थित होते.

संस्थेचे प्राध्यापक व केंद्र प्रमुख डॉ सुनील आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्राध्यापक बाबासाहेब काकडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत हुशारी आहे. परंतु पोलीटेक्‍निक, इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक शिक्षणाच्या कोर्ससाठी आवश्‍यक असलेले ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याची प्रक्रियेमध्ये अनेक पालक व विद्यार्थी अडखळत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करून सल्ला मिळणे आवश्‍यक असते. ही गरज लक्षात घेऊन तालुका पातळीवर संजीवनी शिक्षण संस्थेने नेवाशात हे केंद्र सुरु केले आहे. याचा 10 वी तसेच 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन प्राध्यापक बाबासाहेब काकडे यांनी केले.

इंजिनिअर शिक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन तालुका स्तरावर अशा प्रकारचे मार्गदर्शन केंद्र सुरु करणारी संजीवनी शिक्षण संस्था हि पहिलीच संस्था असावी. प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे नियम शासनाकडून लागू होत असतात. या नियमांची माहिती पालकांनाच काय पण विद्यार्थ्यांनाही माहिती नसते. त्यामुळे चांगल्या संस्थेमध्ये अथवा चांगल्या शैक्षणिक शाखेच्या प्रवेशाला विद्यार्थी मुकू शकतो. हे टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते व ती गरज या मार्गदर्शन केंद्रामुळे पूर्ण होणार आहे. त्याबद्दल संस्थेचे धन्यवाद मानले पाहिजे.
मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्राध्यापक प्रेम आलवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)