अहमदनगर: चिमुरड्यांना प्रवेशासाठी मोजावी लागते मनमानी किंमत

साईबाबा संस्थानच्या इंग्लिश स्कूलमध्ये मुलांची संख्या लक्षणीय असून, शिक्षकांचा अभाव आहे. दरम्यान, ठेकेदारी पद्धतीने किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांच्या तातडीने नियुक्‍त्या करणे गरजेचे आहे. परिसरातील मुलांना संस्कारमय शिक्षण मिळावे यासाठी साईबाबा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये लोअर केजीचे आणखी वर्ग तसेच शिक्षक भरती करणे अत्यंत गरजेचे आहे. – रवींद्र गोंदकर, भाजप सरचिटणीस.

शिर्डी – साईबाबा संस्थानच्या साईबाबा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये लोअर केजीचे वर्ग कमी करण्यात आल्याने शहरातील लहान चिमुरड्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी मनमानी किंमत मोजावी लागत आहे. ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत “शिका संघटित व्हा’ या मूलमंत्राला तिलांजली वाहण्याचे काम साईबाबा संस्थान करीत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, साईबाबा संस्थानचे दिवसेंदिवस स्वरूप वाढत असतानाच संस्थानमार्फत परिसर व शहरातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाची दारे उघडून देण्यात आली. आजतागायत येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले करिअर घडविले आहे. साईबाबा इंग्लिश मीडिअम स्कूल पंचक्रोशीतील सर्वात उत्तम शाळा आहे. साईबाबा इंग्लिश स्कूलमध्ये लोअर केजीचे वर्ग कमी असल्याने लहान मुलांना शिर्डीपासून पाच ते दहा कि.मी. पर्यंतच्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी जावे लागत आहे ही बाब संस्थानच्या दृष्टीने अत्यंत निंदनीय आहे. “शिका, संघटित व्हा,’ या मूलमंत्राला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी स्वतः शाळा सुरू करून शिक्षणाची दारे उघडून दिली. तसेच, कन्या विद्या मंदिरमध्ये मुलींची संख्या वाढली असून, तुकड्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे. पंचक्रोशीतील पालकांची साईबाबांवर श्रद्धा असल्यामुळे परिसरातून येणाऱ्या मुलींना दुसरीकडे शिक्षणास जाऊ देत नाही. त्यामुळे मुलीच्या शिक्षणावर पायबंदी येत असल्याचे समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)