अहमदनगर: अनधिकृत रुग्णालयांवर लवकरच हातोडा

दंड वसूलीतून मिळू शकतो शंभरकोटींचा निधी


शहरात 123 हॉस्पीटलची कामे अनधिकृत


नव्या अध्यादेशाचा लाभ रुग्णालयांना नाही

नगर – शहरातील आघाडीची चार रुग्णालये वगळता सर्वांची कामे अनधिकृत आहेत. महानगरपालिकेने त्यांना अशी कामे पाडण्याचे आदेश बजावलेले आहेत. परंतु या आदेशाला संबंधित रुग्णालयांनी केराची टोपली दाखविली आहे. या सर्वांना आवश्‍यक कार्यवाही पूर्ण करण्याची तीस जून ही अंतीम मुदत आहे.त्यानंतर त्यांच्याकडे मोर्चा वळवू असा इशारा जिल्हाधिकारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या बैठकित दिला आहे. त्यामुळे या मुदतीनंतर रुग्णालयांच्या गोटात खळबळ होणार हे निश्चित.

शहरातील 125 रुग्णालयांनी बांधकाम करताना महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघण केले आहे. त्यामुळे त्यांना मनपाने नोटीस बजावलेल्या आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे. यामुळे काही रुग्णालयांच्या संचालकांना या अध्यादेशानुसार आपलेही बांधकाम नियमित होऊ शकेल असे वाटू लागले आहे. त्यामुळे आज प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे काही डॉक्‍टरांनी समाजमाध्यमांतून फिरविली होती. मात्र प्रत्यक्षात हा अध्यादेश त्यांना दिलासा देणारा नाही. संबंधितांनी वेळेत आपापल्या मालमत्ता मनपाच्या नियमानुसार नियमित करून घेणे आवश्‍यक असल्याचे याबाबत नगररचनाकार संतोष धोंगडे यांनी प्रभातशी बोलताना सांगीतले.

सामान्य प्रकृतीच्या व्यक्तीने कोणत्याही इमारतीच्या बेसमेंटमध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबू नये असा सामान्य संकेत आहे. बेसमेंटमध्ये जादा वेळ थांबणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते. परंतु काही रुग्णालयांनी तर चक्क रुग्णांनाच बेसमेंट मध्ये ठेवल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात रुग्णालयांची बांधकामे झाली. अपवाद वगळता सर्वांनी मनपाच्या नियमांचे उल्लंघण केले. प्रत्यक्षात त्यांची ही कृती धाडसाची म्हणावी लागेल. त्यावर मनपाने त्यांच्या विरोधात कारवीची भूमिका घेतली होती. नियमबाह्य अतिक्रमणे पाडण्यासही सुरूवात झाली होती. त्यावेळी काही ठिकाणी मनपा कर्मचारी व रुग्णालयाशी संबंधितांची चकमकही झाली होती. तर मनपाने घेतलेल्या या भूमिकेवर शहरातील रुग्णालये एकवटली होती. त्यांनी न्यायालयात धाव घेत, अनधिकृत कामे नियमित करून घेण्याचे लेखी दिले. तसेच त्यासाठी काही मुदतही मागून घेतली. न्यायालयातून दिलासा मिळाल्यानंतर कामे नियमित करण्यासाठी मात्र फासरा प्रयत्न कोणी केला नाही. मनपाने अशा 123 रुग्णालयांना नोटीस पाठविली आहे. परंतु पैकी अवघ्या वीस रुग्णालयांनी प्रस्ताव दाखल केले. बाकीच्या रुग्णालयांनी मनपाच्या नोटीसला केराची टोपली दाखविली.
या बांधकामांमध्ये, प्रत्यक्ष बांधकाम परवाना वेगळ्याच कारणासाठी घेऊन रुग्णालय सुरू करणे, मूळ नकाशानुसार प्रत्यक्ष बांधकाम न करणे, अतिक्रमण करणे, रचनेत परस्पर बदल करणे अशा अनेक नियमबाह्य बाबींचा समावेश आहे. परंतु त्यातील ज्या बाबी नियमात बसणे शक्‍य आहे त्या नियमित करण्यासाठी मनपाच्या कायद्यात तरतूद आहे. मात्र त्यासाठी नियमानुसार दंड भरणे आवश्‍यक आहे. असा दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना मनपा प्रशासनाची भितीच उरली नसल्याने आजवर मनपाला संबंधितांकडून धुडकावून लावण्याचाच प्रकार होत आल्याचे दिसते.

मात्र आता नगरला धडाकेबाज जिल्हाधिकारीच आयुक्तपदावर असल्याने हा प्रश्न पुन्हा नियमांच्या ऐरणीवर येणार हे निश्चित. मनपामध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्त द्विवेदींच्या उपस्थितीत अनधिकृत बांधकामांची चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी दिलेली मुदत संपल्यावर संबंधित कामांबाबत कारवाईचा निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते. अजूनही तीस जूनला मुदत असून संबंधित रुग्णालयांनी बांधकामे नियमित करून घेण्यासाठी मनपाच्या अटींची पूर्तता केल्यास संभाव्य कारवाईची नामुष्की टाळता येणे शक्‍य आहे. परंतु आपल्या राजकीय वलयांचा वापर करत पुन्हा यात खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना धडाकेबाज जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा समाना करण्याची वेळ येऊ शकते.

शंभर कोटींचा महसूल मिळेल – धोंगडे

याबाबत नगररचानाकार संतोष धोंगडे यांना विचारले असता, अनधिकृत रुग्णालयांवर कारवाई करून दंड वसूल केल्यास मनपाला चक्क शंभर कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होईल. 2015 च्या अध्यादेशानुसार या सर्वांना तीस जूनच्या आत अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अशी 123 रुग्णालये आहेत. अद्याप वीस रुग्णालयांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत असे त्यांनी सांगीतले. प्रत्यक्षात नव्या अध्यादेशात घरांसाठी सवलत मिळाली आहे. व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)