अहंकारामुळे गुरूंचा विसर

मंचर- जीवनात गुरूंना मानाचे स्थान आहे. गुरूमुळेच आपण घडलो याची कृतज्ञता प्रत्येकांनी व्यक्त केली पाहिजे. परंतु, अहंकारामुळे आपणच स्वतः घडलो असे सांगणाऱ्याचा गर्व जास्त वेळ टिकत नाही. गुरूमुळे आपण घडलो याची जाणीव अनेकांना नसते, अशी खंत डॉ. ज्ञानेश्‍वर थोरात यांनी व्यक्‍त केली.
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. यावेळी डॉ. थोरात यांनी विद्यार्थ्यांना आषाढ पौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात उपप्राचार्य माधव कानडे, पर्यवेक्षक व्ही. पी. पवार, विलास बेंडे, मुर्तुजा मोमीन, यादव चासकर, केशव टेमकर समवेत विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातेकडून जनहिताचे धडे घेतले. विद्यार्थ्यांनीही शिवरायांचा आदर्श ठेवून आपल्या मातेला गुरू समान सन्मान द्यावा, असे प्राचार्य उत्तम आवारी यांनी सांगितले. शरण्या बुरले, सई बाणखेले, तनिष्का गांजाळे, श्रावणी खेडकर, चंदना शर्मा यांनी आपल्या मनोगतात गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. सुवर्ण गोसावी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. राजेंद्र घुले यांनी प्रास्ताविक केले. स्वाती उपार यांनी सूत्रसंचालन तर लता गेंगजे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)