असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शन योजनेसाठी पाचशे कोटींची तरतूद

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी लोकसभेत २ तास अर्थसंकल्पावर भाषण दिले. दरम्यान, त्यांनी मोदी सरकारची ५ वर्षाची कामगिरी सांगितली. तसेच अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या.

या अर्थसंकल्पात असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यात कामगारांना वयाच्या साठाव्या वर्षी तीन हजार रूपयांची पेन्शन मिळू शकणार आहे. मात्र यासाठी कामगारांना दरमहा शंभर रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ग्रॅच्युईटीसाठीची उत्पन्न मर्यादाही आता वाढवण्यात आली असून त्यामुळे वार्षिक 30 लाख रूपये उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टॅक्‍स फ्री ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे. यापुर्वी वार्षिक 20 लाख रूपये उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असंघटीत कामगारांसाठीच्या पेन्शन योजनेबाबत माहिती देताना गोयल यांनी सांगितले की या योजनेसाठी संबंधीत कामगारांना मासिक शंभर रूपयांचे योगदान द्यावे लागेल. त्यात तितक्‍याच रकमेचे योगदान सरकार देणार आहे. या योजनेचा देशातील दहा कोटी लोकांना लाभ होईल असा अंदाज आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठीची जगातील ही सर्वात मोठी पेन्शन योजना आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या योजनेसाठी सरकारने पाचशे कोटी रूपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. गोयल म्हणाले की आज देशातील असंघटीत क्षेत्रात सुमारे 42 कोटी मजूर काम करीत आहेत. त्यांना याचा लाभ घेता येईल. ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रूपयांपर्यंत आहे त्यांना या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)