असंघटित कष्टकऱ्यांचे भरणार साहित्य संमेलन

पिंपरी – कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने असंघटित कष्टकरी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. हे संमेलन रविवारी (दि. 3) आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे होणार आहे.

रविवारी सकाळी साडेआठ वाजता श्रमिकांची अभिवादन दिंडी काढण्यात येईल. त्यानंतर साडेनऊ वाजता संमेलनाचे उद्‌घाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष रानकवी तुकाराम धांडे आहेत. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष काशिनाथ नखाते, मुख्य अतिथी महापौर राहुल जाधव, प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव खटकाळे, शक्तिमान घोष, मानव कांबळे, डॉ. सतीश शिरसाठ, माधव रोहम यावेळी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्‌घाटनानंतर आयुष्याची वाट तुडवताना हे पहिले सत्र होणार आहे. यावेळी बांधकाम मजूर कालिपद सरकार, गटार सफाई मजूर सुरज झांजोट, फळ विक्रेत्या सुनंदा चिखले यांची मानसी चिटणीस मुलाखत घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात संजय कळमकर यांचे कथाकथन होणार आहे. तिसरे सत्र कष्टकऱ्यांच्या साक्षीने हे कविसंमेलन होणार आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष उद्धव कानडे तर प्रमुख पाहुणे दुर्गेश सोनार, मुरलीधर साठे उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलनात पितांबर लोहार, गोविंद वाकडे, भालचंद्र मगदूम, राजेंद्र वाघ, कुमार खोंद्रे, नारायण पुरी, सुरेश कंक, अरुण बकाल आदी कवी सहभाग घेणार आहेत.

चौथ्या सत्रात कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केव्हा उगवेल या विषयावर परिसंवाद होणार आहे. कामगार कायदे सल्लागार उदय चौधरी, श्रमश्री पुरस्कार विजेते बाजीराव सातपुते, म. का. साहित्य परिषद पुणे विभाग अध्यक्ष राजेंद्र वाघ, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक या परिसंवादात सहभाग घेणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, प्रमुख पाहुणे असंघटित कामगार नेते नितीन पवार आदी उपस्थित असणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विनायक चक्रे यांना नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

अनिल बारवकर, साईनाथ खंडीझोड, राजू बिराजदार, मधुकर वाघ, इरफान चौधरी, कासीम तांबोळी, संजय येवलेकर, प्रकाश साळवे, नितीन भराटे, राम बिराजदार, अंजना गुंड, मनीषा राऊत, अरुणा सुतार, सुरेखा कदम, फातिमा शेख, मुमताज शेख, वहिदा शेख, नागनाथ लोंढे, बालाजी लोखंडे, सुरेश देडे, अनिल सूर्यवंशी, सलीम हवालदार, बालाजी इंगळे, अर्चना कांबळे, राजेश माने, रोहिदास माघाडे, शेषराव गायकवाड, गौतम हतागळे, गोपी राठोड, सतीश ठेंगील, छगन रोकडे आदींनी या संमेलनाचे संयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)