अष्टांग- योगाची आठ अंगे (भाग ३)

सर्वेश शशी

अष्टांग- योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू:

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी, यात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्‍यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण आठ भागांत करण्यात आले आहेत. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्‍तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्‍कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्‍यक आहेत. या अंगांमागील सार समजून घेऊ…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

6.धारणा
धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. धारणा म्हणजे व्यक्‍तीने तिचे लक्ष एका बिंदूवर, अविचलितपणे एकाग्र करणे. यामुळे वर्तमानातील क्षणावर नियंत्रण मिळवणे आणि त्याप्रती अधिक सक्रिय होण्यात व्यक्‍तीला मदत मिळते. यासाठी खूप सरावाची गरज आहे पण एकदा यात प्रावीण्य संपादन झाले की मनाला निश्‍चित उद्दिष्टाकडे वळवण्यात खूप मदत होते.

7.ध्यान
ध्यान म्हणजेच मेडिटेशन. ध्यान आणि धारणा यांची अनेकदा गल्लत केली जाते, पण ते तसे नाही. यातील प्रमुख फरक समजून घेऊ. धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर एका वेळी अधूनमधून केंद्रित केलेले लक्ष – यामध्ये काहीतरी क्रिया घडत असते. ध्यान म्हणजे कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष मनावर केंद्रित करणे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती जेव्हा ध्यान करत असते, तेव्हा ती आपण ध्यान करत आहोत असा विचारही करत नाही. ही जागृतावस्थेतील विश्रांतीची अवस्था आहे. यात शरीर विश्रांती घेत असेल पण मन मात्र सावध आणि एकाग्र असते, अगदी बारीक तपशीलही नोंदवून घेत असते. ही अवस्था आयुष्याच्या सर्व प्रमुख पैलूंमध्ये- आर्थिक, भावनिक, मानसिक- सामर्थ्य आणि स्थैर्य देते.

8.समाधी
समाधी ही अवस्था आहे धन्यता आणि आनंदाची. ही अखेरची अवस्था आहे आणि योगाभ्यासातील अखेरचा टप्पा आहे. याचा अर्थ कायमस्वरूपी अत्यानंदाची अवस्था असा नाही. खरे तर ही परिपूर्तीची अवस्था आहे. यामध्ये व्यक्‍ती कोणत्याही भौतिक गोष्टींच्या आणि विश्‍वासांच्या बंधांपासून मुक्‍त असते, मतांपासून मुक्‍त असते आणि तिचे विचारांवर व कृतींवर नियंत्रण असते- खरोखर धन्यतेची अवस्था.

योगाच्या या आठ अंगांमध्ये प्रावीण्य मिळवणे कठीण आहे पण कोणत्याही व्यक्‍तीसाठी हे अशक्‍य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते. त्याशिवाय आपले आरोग्य उत्तम राखण्यात या आठही अंगांचा प्राधान्याने उपयोग कसा होतो, तेही आपण पाहणार आहोतच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)