अष्टांग- योगाची आठ अंगे (भाग २)

सर्वेश शशी

अष्टांग- योगाची आठ अंगे जीवनशैलीत कशी सुधारणा घडवून आणतात, ते बघू:

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी, यात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्‍यक आहे. योगाभ्यासाचे वर्गीकरण आठ भागांत करण्यात आले आहेत. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्‍तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्‍कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्‍यक आहेत. या अंगांमागील सार समजून घेऊ…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

3.आसन
आसने म्हणजे आपले शरीर लवचिक, तंदुरुस्त आणि कणखर राखण्यात मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती. शरीर आणि मनातील समायोजन व समतोल समजून घेण्याच्या तसेच त्याचा सराव करण्याच्या या पद्धती आहेत. या स्थितींमुळे साधकाला आयुष्यातील कसोटीच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यात तसेच आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने बघण्यात मदत होते.

4.प्राणायाम
प्राणायाम हा शब्द दोन शब्दांचा संधी आहे- प्राण आणि आयाम. हा श्‍वासांना स्थिर हालचालींशी जोडण्याचा सराव आहे किंवा थोडक्‍यात श्‍वासावर नियंत्रण ठेवणे आहे. योगाच्या आठ अंगांपैकी हे चौथे अंग आहे. प्राणायामाच्या अभ्यासाला शास्त्रीय संशोधनांचा आधार आहे. ताण, चिंता आणि अन्य वेदनांचा प्रतिकार करणाऱ्या प्रतिक्रियांना उद्दिपीत करणाऱ्या पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्थेला कार्यान्वित करण्यासाठी तसेच शरीराला आराम देण्यासाठी प्राणायाम प्रभावी ठरतो. श्‍वासावर नियंत्रण ठेवण्यास शिकल्यामुळे मनावर नियंत्रण ठेवण्यातही मदत मिळते आणि यातून तुम्हाला स्वत:ला आणि या अभ्यासाला अधिक चांगले समजून घेता येते.

5.प्रत्याहार
प्रत्याहार म्हणजे अनावश्‍यक किंवा सकारात्मक वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींतून आपल्या संवेदना काढून घेण्याची पद्धत. मनाची प्रतिकारशक्‍ती बळकट कण्यात याचा उपयोग होतो. हे अंग ध्यानाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे. आपल्या आतील अस्तित्वाकडे जाण्यास ते व्यक्‍तीला मदत करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)