अशाप्रकारे करा फेसबुक व्हिडीओ डाउनलोड

फेसबुकवरील काही व्हिडीओ आपण पाहतो, ते आपल्याला आवडतात पण तो व्हिडीओ डाउनलोड करण्याचा पर्याय आपल्याला माहीत नसतो त्यामुळे अनेकवेळा आपली निराशा होते पण आम्ही आपल्याला या लेखाव्दारे यासंबंधी महत्वाची माहिती देणार आहोत. जर तुम्ही मोबाइलऐवजी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप द्वारे फेसबुक एक्‍सेस करत असाल तर फेसबुकवरील व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा याचा सोप्पा पर्याय आहे. तुम्हाला विडोंज, लिनक्‍स वर फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करायचा असेल तर अॅड-ऑन किंवा एक्‍सटर्नल ऍप वापरावे लागेल. फेसबुकवरील व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक वेबसाइट आहेत, त्यापैकी एक म्हणजे fbdown.net ही एक होय.

स्टेप्स –
1. सर्वात आधी तुम्हाला जो व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे, त्या व्हिडीओवर राइट क्‍लिक करा. त्यानंतर कॉपी व्हिडीओ यूआरल (copy video URL) क्‍लिक करा.
2. त्यानंतर fbdown.net वेबसाइट ओपन करा.
3.तेथे enter facebook video link या टेक्‍स बॉक्‍समध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
4. लिंक पेस्ट करून डाउनलोडवर क्‍लिक केल्यास more option यामध्ये तुम्हाला एसडी आणि एचडी क्वालिटीमध्ये व्हिडीओ डाउनलोड करण्यासंबंधी पर्याय दिसतील.
5. हवा तो पर्याय निवडून डाउनलोड म्हटल्यास कॉम्प्युटर मधील डाउनलोडमध्ये संबंधित व्हिडीओ तुम्हाला दिसेल.
अशाच प्रकारे तुम्ही अॅड्राइड फ्लटफॉर्मवर देखील व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

4K video downloader  हा एक पर्याय आहे पण याव्दारे तुम्ही 240 पिक्‍सलचे 2K क्वालिटी व्हिडीओच डाउनलोड करू शकता. हे अॅप फेसबुकवरील व्हीडिओ 4K मध्ये डाउनलोड करण्यासाठी सक्षम नाही. याव्दारे तुम्ही फक्त you tube चे 4K व्हिडीओच डाउनलोड करू शकता.
1. सर्वात आधी 4kvideodownloade.com वर जा. 4K video downloader डाउनलोड करून इंस्टॉल करा.
2.त्यानतर फेसबुक व्हिडीओवर राइट क्‍लिक करून कॉपी केलेली व्हिडीओ यूआरल लिंक 4K video downloader मध्ये पेस्ट करा.
3. त्यानंतर व्हिडीओ क्वालिटी पर्याय निवडून व्हिडीओ डाउनलोड करा.

थर्ड पार्टी व्दारे फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करताना शक्‍यतो क्रोम, फॉयरफोक्‍स ब्राउजर वापरणे जास्त सुरक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)