अव्हेंंजर्सची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

नुकताच रीलिज झालेला ‘बागी 2’ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आता हॉलिवूडच्या एका चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार एन्ट्री घेतली आहे. अनेक सुपरहिरोजनी सजलेल्या ‘अव्हेजर्न्स : इन्फिनिटी वॉर’ या सिनेमाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशीच या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर उत्तम ओपनिंग मिळाले आहे.  सुमारे 2000 स्किन्सवर रीलिज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 .30 कोटींची कमाई केली आहे.

30 मार्चला रीलिज झालेल्या ‘ बागी 2’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.10 कोटींची कमाई केली होती. मात्र नुकत्याच रीलिज झालेल्या अव्हेंजर्सने इंग्लिश आणि डब व्हर्जनमध्ये मिळून 31 कोटींचा गल्ला जमावला आहे. पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा अव्हेजर्स हा पहिला हॉलिवूड सिनेमा ठरला आहे. यानंतर ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून अव्हेजर्स या चित्रपटाने इतर हॉलिवूड सिनेमांसाठी भारतामध्ये नवा बेंचमार्क रचल्याचं मत व्यक्त केलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)