अवैध वाळू उपसा करणार्‍या चौघांना अटक

कोरेगाव, दि. 31 (प्रतिनिधी) -शिरढोण, ता. कोरेगाव) गावच्या हद्दीतील वसना नदी पात्रामध्ये बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणार्‍या चार ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रांताधिकारी किर्ती नलवडे यांनी कारवाई करून वाळू तस्करांना सहा लाखांचा दंड ठोठावला. तसेच आठ वाळू तस्करांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात वाळू चोरीचे गुन्हे दाखल केली. याप्रकरणी चौघांना अटक झाली असून उर्वरित चौघांचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरढोण, (ता. कोरेगाव) गावचा शिखरे इनाम नावाच्या शिवारात वसना नदी पात्रात 31 रोजी पहाटे कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी किर्ती नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी कोरेगाव पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने अनधिकृत वाळू उपसा करणार्‍या वाळू अड्डयावर आणि वाळू तस्करांवर धाड टाकली आणि वाळूने भरलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण 13 लाख 20 हजारांचा मुद्देमाल आणि चोरलेली वाळू ताब्यात घेतली.
वाळू उपसा करणारी चारही ट्रॅक्टर ट्रॉली कोरेगाव तहसील कार्यालयात आणून त्यांच्यावर सहा लाखांचा दंड ठोठावला. तसेच तलाठी विक्रम जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात वाळू चोरी करणार्‍या तानाजी राजाराम फुलारे, रोहित रवी अडागळे, काशिनाथ शंकर पवार, रोहिदास सुरेश फडतरे, संजय बबन फडतरे, सुनील गोवर्धन देडे, सागर बर्गे, अक्षय बर्गे या आठ जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यापैकी तानाजी फुलारे, रोहित आडागळे, काशिनाथ पवार व रोहिदास फडतरे या चौघांना कोरेगाव पोलिसांनी अटक केली व उर्वरित चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)