अवसरी वळई पेटविण्याचे सत्र तिसऱ्या दिवशीही सुरूच

शेतकरी भयभीत ः ऐन दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे नुकसान

अवसरी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील मधला टेमकरमळा येथे अज्ञात व्यक्तीने सुरेश गजानन टेमकर यांची कडब्याची वळई पेटवून दिली. सतत गेले तीन दिवस शेतकऱ्यांच्या कडब्याची वेळई पेटून दिल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रूपयाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
अवसरी खुर्द येथील मधला टेमकर मळा येथे सुरेश गजानन टेमकर यांचा मुलगा गणेश यांच्या कडब्याच्या वळाई सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागल्याचे दिसले. अज्ञात व्यक्तिने ती पेटवून दिली. वळई पेटवल्याचे लवकर लक्षात आल्याने उर्वरित कडबा स्थानिक तरुणांनानी लवकर विझवल्याने वाचवता आला आहे. तीन महिन्यांपूर्वी याच शेतकऱ्याच्या गोठ्यातील चार गायी रात्रीच्या वेळी चोरण्याचा प्रयत्न झाला होता. नागरिकांच्या आरडा ओरडीमुळे अज्ञात व्यक्तीने गायी सडून पळून गेला होता. आता त्यानंतर हा आगीचा प्रकार घडला आहे. याच वस्तीवरील विजय किसन टेमकर, मधुकर सुभाष टेमकर या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसयासाठी असणाऱ्या गायीसाठी कडबा साचवून ठेवला होता. तो कडबासुद्धा शनिवार आणि रविवार या दिवशी पेटवून देण्याचा प्रयत्न झाला होता. विजय टेमकर यांचेकडे सात जनावरे आहेत तर मधुकर टेमकर यांच्याकडे सहा जनावरे आहेत. सध्या तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती पाहता हा कडबा पुढील काळात जनावरांना खाद्य म्हणून साठवून ठेवला होता. सलग तीन दिवस जनावरांचे खाद्य पेटवणून देण्याच्या घटने मुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)