अवसरी खुर्द येथील शाळेला साहित्य भेट

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेला दहा संगणक, दहा एलईडी टीव्ही संच व सातशे पेक्षा जास्त शालेय सुलेखन वह्या असे एकूण चार लाख रुपयांचे साहित्य वाटप जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती सरपंच सुनीता कराळे यांनी दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदचे सदस्य अरुणा थोरात, पंचायत समितीचे सदस्य संतोष भोर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दगडू मारुती शिंदे, माजी सभापती आनंद शिंदे, तालुका राष्ट्रवादी कांग्रेस युवक अध्यक्ष निलेश थोरात, उपसरपंच राजू शिंदे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा एक व दोन साठी प्रत्येकी दोन संगणक, एक एलईडी व दोनशे व शाळा नंबर दोन साठी 100 वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिंदेमळा येथील शाळेसाठी दोन संगणक दोन एलईडी व एकशे चाळीस वह्यांच वाटप करण्यात आले. भोरवाडी येथील शाळेस दोन संगणक तीन एलईडी व पन्नास वह्या तर कराळेवाडी येथील शाळेस एक संगणक, दोन एलइडी व चाळीस वह्यांचे वाटप करण्यात आले. वायाळमळा येथील एक संगणक, एक एलईडी व पन्नास वह्यांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती उपसरपंच राजेंद्र शिंदे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)