अवसरी- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील पंधरा विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला. निखिल बाळासाहेब जारकड, जानव्ही पांडुरंग हिंगे, ओंकार विलास हिंगे, जानव्ही संजय वळसे, स्वप्नील सुभाष जगताप, सानिया साहेबराव गायकवाड, पूर्वा विजयराज निकम, रश्मी दत्तात्रेय सोनवणे, सिद्धी विकास फुलसुंदर, तनुजा लंकेश भय्ये, आदेश संदीप राक्षे, नीलिमा काळूराम राक्षे, प्रिया उत्तम टेमकर, सानिका दिलीप थोरात, प्रज्वल घनश्याम लोखंडे हे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. एन. आर. टाव्हरे, एस. के. जारकड, एन. बी. लंगडे, शिक्षिका एस. डी. शेळके, एम. एच. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्दशन केले. संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे, सचिव वसंत हिंगे, कार्याध्यक्ष गणपत हिंगे, प्राचार्य आर. बी. हळदे, जे. ए. सुपेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अवसरीचे 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
Ads