अवघड, सोप्या क्षेत्रातील शाळांसाठी नियमावली तयार होणार

पाहणीसाठी लवकरच पथक : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

पुणे – जिल्ह्यातील “अवघड क्षेत्रातील शाळा’ अशी नोंद असलेल्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून, त्या अवघड, की सोप्या क्षेत्रात येतात, याचा आढावा घ्यावा. त्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार आता अवघड आणि सोप्या क्षेत्रातील शाळा यांची नियमावली तयार करून, शाळांची पाहणी करण्यासाठी पथक नेमण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात 3 हजार 600 हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील आणि सोप्या क्षेत्रातील शाळा, अशा दोन नोंदी आहेत. त्यामध्ये 934 शाळा अवघड क्षेत्रात आहेत. अवघड क्षेत्र म्हणजे दुर्गम किंवा डोंगराळ भागात तसेच तालुक्‍याच्या ठिकाणाहून लांब किंवा दळण-वळणाची सुविधा नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात होतो. परंतू, ह्या नोंदी जुन्या असून, दरवर्षी केवळ “कॅरिफॉर्वर्ड’ केल्या जातात. त्यामुळे ज्या शाळेपर्यंत रस्ते, वाहने पोहचलीत, त्या क्षेत्रांतील शाळा आजही अवघड क्षेत्रामध्येच गणल्या जात आहेत. दरम्यान, या शाळा सोप्या क्षेत्रात नोंद करण्यासाठी ठोस नियमावली तयार नाही. त्यामुळे राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी काढलेल्या अध्यादेशामध्ये अवघड क्षेत्राची व्याख्या सांगून, ते निश्‍चितीची कार्यवाही करताना सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचा आढावा घ्यावा, त्यासाठी नियमावली तयार करून ज्या शाळा सोप्या क्षेत्रात येतात, याबाबत तपासणी अहवाल तयार करावा, असे आदेश मांढरे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. त्यानुसार शाळांची पाहणी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.

बहुतांश शाळा सोप्या क्षेत्रात येणार?
काही वर्षांपूर्वी अवघड क्षेत्रात जाण्यासाठी शिक्षक टाळाटाळ करत होते. कालांतराने त्याठिकाणी रस्ते तयार झाले, वाहनांची सुविधा सुरू झाली आणि शिक्षक अवघड क्षेत्रात जाण्यास तयार होवू लागले. कारण, अवघड क्षेत्रात काही वर्षे सेवा केल्यावर नंतर सोप्या क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळते. मात्र, प्रत्यक्षात ती शाळा सोप्या क्षेत्रात येते असते. केवळ शिक्षण विभागाकडे अवघड क्षेत्रातील शाळा अशी नोंद असल्यामुळे शिक्षकांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे भविष्यात अवघड क्षेत्रातील शाळा सोप्या क्षेत्रात आल्यावर शिक्षकांची ही संधी हुकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)