“अल्फा लावल’चा कंपनीतील सुरक्षेबाबत “लक्ष्यभेद’

पिंपरी – दापोडी येथील अल्फा लावल इंडिया कंपनीला सुरक्षा कार्यक्रमासाठी अमेरिकेतील “एफएम ग्लोबल’ कंपनीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. अल्फा लावलच्या दापोडी प्रकल्पाने कारखान्यात होऊ शकणाऱ्या दुखापतींचे प्रमाण 2015 पासून पन्नास टक्‍क्‍यांनी घटवले आहे.

अल्फा लावल इंडिया प्रायवेट लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन्स) मॅटिअस के. अँडरसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी कारखाना व्यवस्थापक एस. आर. चिपळूणकर, सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापक संजय मारणे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड रजिता कुमार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एफएम ग्लोबल ही औद्योगिक मालमत्ता विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य जागतिक कंपनी आहे. येत्या दीड वर्षांमध्ये म्हणजे सन 2020 पर्यंत हे प्रमाण अजून तीस टक्‍क्‍यांनी कमी करत कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा आखणी उंचावण्याचा कंपनीचा निर्धार आहे. जिवीतहानी आणि दुखापतजन्य कालापव्यय (लॉस टाईम्स इन्ज्युरी- एलटीआय) शून्य राखण्याची आपली परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार कंपनीने केला आहे.

अँडरसन म्हणाले की, अल्फा लावलने नेहमीच कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. अल्फा लावलच्या परिसरात येणारे कर्मचारी आणि इतरांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी आणि आल्हाददायी वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतून आमचा आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम सिद्ध झाला आहे. आम्ही सुखरुप घरी पोहचतो, अगदी दररोज’ हे कंपनीचे या आरोग्य आणि सुरक्षेबाबतचे ब्रीद वाक्‍य आहे. अल्फा लावलची शाश्वत विकासाच्या मूल्यावर श्रद्धा आहे. पाणी आणि ऊर्जा बचतीबाबत आम्ही मिळविलेले यश हे आमची याबाबतची वचनबद्धता सिद्ध करते, असेही अँडरसन म्हणाले.

पाणी व उर्जा बचतीचा संदेश
अल्फा लावलने भारतातील त्यांच्या कारखान्यांमध्ये पाणी आणि ऊर्जा बचतीतही लक्षणीय सुधारणा केली आहे. दापोडी प्रकल्पासाठी मान्य करण्यात आलेल्या सरासरी प्रमाणापेक्षा 35 टक्‍क्‍यांनी कमी पाणी वापरण्यात यश मिळविले आहे. सन 2017-18 या कालावधीत उर्जा बचतीच्या बाबतीत हे प्रमाण पाच टक्‍के इतके आहे, असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

सुरक्षेच्या मुद्यांवर उत्कृष्ट कार्यशैली स्वीकारत सक्रियपणे एक सुरक्षा संस्कृतीच कंपनीत निर्माण केली आहे. आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण यांच्या संदर्भात सर्वोच्च दर्जा राखण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञान आणि प्रमाणीकरणाचा उत्तम मिलाफ घडविण्यात आला आहे. अल्फा लावलच्या जगभरातील कारखान्यांमध्ये सुरक्षा आणि दर्जा या निकषांवर दापोडीचा कारखाना अग्रगण्य मानला जातो.
– मॅटिअस के. अँडरसन, संचालक, अल्फा लावल इंडिया प्रा. लि.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)