अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्ष सक्तमजुरी

पुणे – क्‍लासला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दहा वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी सुनावली.
बबलू प्रकाश गायकवाड (वय 27, रा. धनकवडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती. पीडित मुलगी 17 जानेवारी 2014 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास टिंगरेनगर येथे क्‍लासला गेली होती. त्यावेळी बबलू याच्या एका साथीदाराने तिचे अपहरण केले. एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर सोडले. तेथून बबलू हा पीडितेला दिघीतील विजयनगर येथे घेऊन गेला. त्याठिकाणी असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत त्याने पीडितेला नेले. घाबरलेली पीडित घरी सोडण्याची मागणी करत रडू लागली. त्यावेळे बबलूने तिला शांत बस नाहीतर तुला कधीच घरी सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बबलू याच्या दुसऱ्या साथीदाराने तिला बसस्टॉवर सोडले.
दरम्यान पीडित मुलगी सापडत नसल्याने तिच्या घरच्यांना क्‍लास, तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र तरीही ती सापडली नव्हती. त्यामुळे मिसींगची तक्रार देण्यात आली होती. पीडिता घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार फिर्याद देण्यात आली होती. या प्रकरणात सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण 12 साक्षीदार तपासले. त्यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून एम. गोरडे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजत हवालदार के. बी. जगताप आणि पोलीस शिपाई एस. एम. आसवले यांनी मदत केली. बबलू याला शिक्षा सुनावली. तर तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. मुक्त झालेल्या एकाच्या वतीने ऍड. सुहास फराडे यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)