अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा सांगली जिल्ह्यातून ताब्यात

नागठाणे- अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून घेऊन गेलेल्या युवकास अल्पवयीन मुलीसह बोरगाव पोलिसांनी आळसंद (ता.खानापूर.जि. सांगली) येथून ताब्यात घेतले. उदय सर्जेराव पडवळ (वय 28 रा.शेंद्रे, ता. सातारा) असे युवकाचे नाव आहे. दीड महिन्यांपूर्वी त्याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेंद्रे येथील अल्पवयीन मुलगी अतीत (ता. सातारा) येथे तिच्या मामाकडे गेली असता शेंद्रे येथीलच उदय पडवळ याने तिला तेथून फूस लावून पळवून नेले होते. या घटनेची फिर्याद पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दीड महिन्यांपूर्वी दिली होती. पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहरण व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र ते सापडत नव्हते.

अखेर अल्पवयीन मुलीला घेऊन उदय पडवळ हा आळसंद (सांगली) येथे असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान, सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे, सुनील पाटील, राजू शिखरे, किरण निकम व चेतन बगाडे यांनी त्यांना तेथून ताब्यात घेतले. पोलिसांनी उदय पडवळ यांच्या विरोधात, पोस्कोसोबतच बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. तपास हवालदार सुनील पाटील करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)