अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दुशेरेतील घटना, युवकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

कराड दि. 30 (प्रतिनिधी) -अल्पवयीन शाळकरी मुलीला निर्जनस्थळी बोलावून गावातीलच युवकाने विनयभंग केल्याची घटना दुशेरे (ता. कराड) येथे शनिवारी (दि. 29) दुपारी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात एकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. सागर रमेश जाधव, असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी इयत्ता सातवीत शिकत आहे. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिच्या समवेत शिकत असलेल्या मुलीचा लहान भाऊ पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी त्याने आमची दीदी रानात गेली असून तुला तिने रानात बोलवले असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित मुलगी मैत्रिणीच्या लहान भावासमवेत रानात गेली. त्यावेळी उसाच्या शेताच्या बाजूला थांबलेल्या सागर रमेश जाधव याने पीडित मुलीला हाक मारून ‘तुझी मैत्रीण या उसात आहे’, असे सांगून जवळ बोलावले. पीडित मुलगी जवळ येताच तिला पाठीमागून मिठी मारली. पीडित मुलीने संशयीताच्या तावडीतून सुटका करून तेथून धूम ठोकली. काही अंतरावरच गावातील एक महिला पीडित मुलीच्या नजरेस पडली. मुलीने त्या महिलेकडे धाव घेऊन घडला प्रकार सांगितला.
रविवारी दुपारी पीडित मुलीने कुटुंबियासमवेत कराड तालुका पोलीस ठाण्यात येऊन सागर रमेश जाधव याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)