अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्‍लील चाळे; तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे – अकरावीच्या क्‍लासला निघालेल्या मुलींकडे पाहून अश्‍लील चाळे करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 आणि भारतीय दंड संहिता कलम 354 (अ) (विनयभंग) नुसार ही शिक्षा झाली आहे. दंड न भरल्यास त्याला तीन मैहिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

युवराज ऊर्फ चिऊ राज अडसुळ (वय 19, रा. अप्पर इंदिरानगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत धनकवडी भागात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना 28 जुलै 2016 ते त्यापूर्वीच्या तीन ते चार दिवसाच्या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राजेंद्र नागवडे आणि सहायक पोलीस फौजदार डी.के.कुंभार यांनी मदत केली. फिर्यादीने अकरावीच्या विज्ञान शाखेच्या विषयांसाठी धनकवडी, के.के.मार्केटजवळ क्‍लास लावले होते. क्‍लासला जात असताना तिला पाहून अडसुळ अश्‍लील चाळे करत असते. त्यानंतर तो तसाच प्रकार त्या क्‍लासला जाणाऱ्या इतर मुलींसमोरही करत असल्याचे निष्पन्न झाले होते. यावर तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. घोगरे पाटील यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.