अल्पवयीनाने चार दुचाकी जाळल्या

पिंपरी – भाटनगर येथे 14 वर्षीय अल्पवयीनाने चार दुचाकी जाळल्याची घटना मंगळवारी (दि.31) पहाटे तीनच्या सुमारास घडली. अपल्पवयीन मुलाने रागाच्या भरात एक दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला; मात्र पार्किंगमध्ये असलेल्या इतर चार दुचाकीही जळून खाक झाल्या आहेत. चिंचवड पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याने गाड्या जाळल्याचीही कबुली दिली आहे. जुना राग काढण्यासाठी मुलाने सुरुवातीला एक गाडी पेटवली होती; मात्र आग वाढत गेली व त्यात चार दुचाकी जळाल्या तर एका पत्रा शेडलाही त्याची धग पोहचली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)