अल्पवयीनांनी चोरल्या 32 शेळ्या

– पोलिसांनी उधळला आषाढ पार्टीचा बेत

पिंपरी – आषाढ पार्टीसाठी चार अल्पवयीन मुलांनी शहरातील विविध भागातून 32 शेळ्या चोरल्याची अजब घटना घडली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिनकर नामा काळे (वय-78, रा. कचरा डेपोजवळ, कॅन्टोमेंट चाळ, कासारवाडी) यांनी बुधवारी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर नामा काळे यांच्या 11 शेळ्या पहाटे साडेचारच्या सुमारास चोरीस गेल्या. चोरीला गेलेल्या शेळ्यांमध्ये आठ शेळ्या आणि तीन बोकड यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी चोरीला गेलेल्या अकरा शेळ्यांसह एकूण 32 शेळ्या भोसरी पोलिसांनी चार शेळी जप्त केल्या आहेत. त्यातील काळे यांच्या अकरा शेळ्या त्यांना परत देण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या शेळ्या हिंजवडी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहेत. या चार मुलांनी आषाढ महिन्यात मटणाला जास्त भाव असल्याने कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी ही चोरी केल्याचे कबुल केले आहे.

पोलिसांनी पळून जाणाऱ्या चारही अल्पवयींनाना ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान 32 शेळ्या चोरल्याचे एकूण पोलिसही चक्रावून गेले होते. पोलिसांनी या शेळ्या पंचनाम्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात सोडल्याने नागरिकांमध्येही शेळ्यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. आर. कठोरे करत आहेत.

असा आला प्रकार उघडकीस
रात्रीच्या वेळी शेळ्या चोरी करायच्या व त्या शेळ्या अंधारात रेल्वे रुळावरुन चालवत इच्छीत स्थळी नेल्या जात असत. यामुळे हा प्रकार आत्तापर्यंत उघडकीस आला नव्हता. बुधवारी रात्री या मुलांनी काळे यांच्या शेळ्या चोरल्या मात्र या घरी नेत असताना उशीर झाल्याने त्यांनी शेळ्या कासारवाडी येथे रेल्वे रुळावरच बांधल्या होत्या. दरम्यान भोसरी पोलीस फिर्यादी काळे यांच्या शेळ्या चोरीला गेल्याचा तपास पोलीस करत होते. यावेळी कासारवाडी येथे रुळावर शेळ्या बांधल्याचा अजब प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यातून 32 शेळ्या चोरल्याचे उघडकीस आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)