अर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा

लंडन – 22 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अर्सेनल संघाचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर हे आपल्या पदावरून पायउतार होत आहेत. चालू मोसम संपल्यानंतर प्रशिक्षकपद सोडणार आहे, अशी घोषणा वेंगर यांनी केली. “”इतक्‍या प्रदीर्घ कालावधीसाठी मला अर्सेनलचे प्रशिक्षकपद सांभाळता आले, याचा मला अभिमान वाटतो,” असे वेंगर यांनी म्हटले आहे. तीन प्रीमियर लीगचे विजेतेपद तसेच 2003-04 च्या मोसमात अपराजित राहण्याची कामगिरी आणि सात वेळा एफए चषक पटकावण्याची करामत त्यांच्या कारकिर्दीत संघाने केली आहे.

मात्र अर्सेनलला गेली 14 वर्षे प्रीमियर लिगचे विजेतेपद पटकावता न आल्याने वेंगर यांच्यावरील दडपण वाढले होते. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा पात्रता फेरीतच त्यांचे आव्हाण संपुष्टात येण्याची शक्‍यता असल्याने त्याचे दडपणही त्यांच्यावर होते. स्पेनचा मातब्बर संघ ऍटलेटिको माद्रिदला 27 एप्रिल आणि 4 मेच्या युरोपा लिगच्या उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतरच अर्सेनलला पात्रता फेरीतुन पुढे जाता येणार आहे. “”अर्सेनलने सर्वोत्तम कामगिरी करावी, या उद्देशाने सर्व चाहत्यांनी संघाचे समर्थन करावे. अर्सेनलच्या चाहत्यांनी संघाच्या मूल्यांना नेहमीच महत्त्व दिले आहे,” असेही वेंगर यांनी नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)