#अर्थकारण: आभासी चलनावर नियंत्रणाची गरज (भाग २)

#अर्थकारण: आभासी चलनावर नियंत्रणाची गरज (भाग १)
सागर शहा (सनदी लेखापाल) 
भारतात आभासी चलनाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी चलनांमधील देवाणघेवाण बंद करण्याचा आदेश दिला आहे त्याला आव्हान देणारी एक याचिका कोर्टात दाखल झाली होती. रिझर्व्ह बॅंकेनेही अनेक प्रसंगी गुंतवणूकदारांना बिटकॉईनविषयी धोक्‍याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही गुंतवणूकदारांवर याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. अर्थात जगभरात अनेक देशांनी बिटकॉईनविषयी कडक धोरण अवलंबिले आहे. भारतानेही तशीच भूमिका घ्यायला हवी. 
त्याच दरम्यान क्रिप्टोकरन्सी एक्‍स्चेंजने आभासी चलनांमध्ये परस्पर व्यवहार करण्याची सुविधा देऊ करुन रुपयांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच मोठ्या एक्‍स्चेंजमध्ये ही सुविधा उपलब्ध होते. काही एक्‍स्चेंजमध्ये पीअर टू पीअर प्लॅटफॉर्म सारख्या सुविधा व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. एक्‍स्चेंजच्या मतानुसार निर्बंधांमुळे सुरुवातील किमती पडल्या होत्या. पण बाजार लवकर स्थिरावला. सध्या एक्‍स्चेंज पीअर – टू – पीअर प्लॅटफॉर्म व्यापाऱ्यांना उपलब्ध करुन देऊन आभासी चलनाच्या व्यापाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक्‍स्चेंजच्यानुसार आभासी चलनाच्या किमती सध्यातरी स्थिर आहेत. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लावल्यानंतर त्याच्या मूल्यात घट झालेली पाहायला मिळाली होती.
फोर्ब्स ने पहिल्यांदाच क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी चलन बाळगणाऱ्या श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यादीत अशा व्यक्तींची नावे आहे ज्यांच्याकडे किमतीचा विचार करता कोट्यवधी – अब्जावधी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी आहे. या यादीत रिपलचे सहसंस्थापक क्रिस लार्सन अग्रेसर आहेत. लार्सन यांच्या क्रिप्टो चलनाचे मूल्य 7.5 ते 8 अब्ज डॉलर इतके आहे. नियमन नसलेल्या क्रिप्टो चलनाच्या मूल्याने उसळी घेतली आहे. फोर्ब्सच्या मते क्रिप्टो चलन म्हणजे बिटकॉईन, एथेरियम आणि एक्‍सआरपीच्या सरासरी मूल्यात 2017 मध्ये 14 हजार 409 टक्‍क्‍यांची उसळी घेतली होती.
ही तीनही चलने क्रिप्टोकरन्सीमध्ये सामील आहेत. फोर्ब्सनुसार तब्बल 1 हजार 500 क्रिप्टो चलन सध्या चलनात आहेत. त्यांचे एकूण मूल्य हे 550 अब्ज डॉलर इतके आहे. 2017 या वर्षाच्या सुरुवातीस या मूल्यांमध्ये 31 टक्के वाढ झाली होती. फोर्ब्सच्या दृष्टीने या प्रकारच्या संपत्तीची माहिती ही सामान्य जनतेलाही असली पाहिजे. या यादीमध्ये 1.5 अब्ज डॉलरच्या क्रिप्टो मूल्याच्या चलनासह जोसेफ ल्युबिन दुसऱ्या स्थानावर आहे. चांगपेंग चाओ 1 ते 1.2 अब्ज डॉलर्स सह तिसऱ्या, कॅमेरुन अँड टायलर विंकेलवास 90 कोटी ते 1.1 अब्ज डॉलर सह पाचव्या स्थानावर आहे. भारतात ज्या प्रकारे आभासी चलनाची लोकप्रियता वाढते ते पाहता आभासी चलनाच्या व्यापाराला रोखणे शक्‍य होणार नाही. त्यासाठी सरकारनेच या संदर्भात ठोस दिशा निर्देश निर्माण कऱणे आवश्‍यक आहे.
गेल्या दोन महिन्यांदरम्यान संपूर्ण जगातील अर्थजगत हे बिटकॉईन आणि इतर आभासी चलनांच्या मूल्यांच्या वेगवान चढउतारांमुळे खूपच सतर्क झाले आहे. जगातील अनेक देशांनी या चलनाला नियंत्रित करण्यासाठी एक नियामक प्रणाली सुरू केली आहे जेणेकरून विपरीत परिस्थितीमद्ये त्यांच्या आर्थिक हितांना बाधा येऊ नये किंवा त्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये. इतर देशांप्रमाणे भारतातही याविषयी एक समिती स्थापन करण्यात आली आहे जी आभासी चलनाच्या देवाणघेवाण आणि त्याचा व्यापार नियंत्रित करण्याच्याविषयी काही पद्धती सुचवेल. संपूर्ण जगातच बिटकॉईन आणि त्यासारखी इतर आभासी चलने गुन्हे जगतात वापरली जात असल्याने भारत सरकार याबाबत सजग झाले आहे. कोणत्याही देशाकडून कायदेशीर चलन म्हणून ते जाहिर न झाल्याने या चलनांवर सध्या तरी सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याचमुळे गुन्हेगारी जगताकडून सध्यातरी याचा फायदा घेतला जात नाही.
आभासी चलनाचा व्यापार संपूर्णपणे पिअर टू पिअर प्रणालीवरच आधारित आहे. त्यामुळे या व्यापाराची माहिती ही त्या एजन्सीला किंवा व्यक्तीलाच मिळू शकते ज्याच्याकडे वापरकर्त्याचा आयडी आणि पासवर्ड असेल. पण अडचण अशी आहे की बिटकॉईनच्या प्रसारामुळे क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानाच्या तज्ज्ञांनी इतक्‍या मोठ्या प्रमाणात आभासी चलनाचे जाळे तयार केले आहे की त्यामध्ये शिरून त्याविषयी माहिती मिळवणेही निश्‍चितच कठीण जाणार आहे. जगात सध्या बिटकॉईनसारख्या 13 आभासी मुद्रा बाजारा विविध मूल्यांवर कारभार केला जात आहे. बाजारात या विविध आभासी चलनांची बाजारात किंमत काही हजार ते अब्जावधी रुपये आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)