अरविंद केजरीवाल यांना क्‍लीन चीट

संग्रहित छायाचित्र....

मुंबई – आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबई न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने 2014च्या निवडणुकांमधील प्रचारसभेच्या प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निवडणुकांच्यावेळी केजरीवाल, मेधा पाटकर तसेच मीरा सन्याल यांनी पोलिसांची परवानगी न घेता प्रचारसभा काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र पोलीस ऍक्‍टअंतर्गत प्रचार सभा घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी 2014मध्ये लोकसभेचा प्रचार करताना या तिघांनी घेतली नव्हती, असा आरोप होता. परंतु पोलिसांनी तिन्ही आरोपींना प्रचार सभेची परवानगी नाकारत आहोत, असे पत्र दिले नसल्याचे शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायदंडाधिकारी पी. के. देशपांडे यांनी केजरीवालांची या मुद्यावरून मुक्तता केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपच्या तिकिटावर मीरा सन्याल व मेधा पाटकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी मानखुर्दमध्ये सभा घेतली होती. ही सभा नियोजित नव्हती आणि तिच्यासाठी आवश्‍यक ती परवानगीही घेण्यात आली नव्हती, असा दावा पोलिसांनी केला होता. या सुनावणीसाठी आज अरविंद केजरीवाल व मीरा सन्याल दोघे न्यायालयात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)