अरब अमिराती आणि सौदीवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची इराणची धमकी

तेहरान – संयुक्‍त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या राजधानीवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याची धमकी इराणमधील कट्टरवाद्यांच्या “रिव्होल्युशनरी गार्ड’ या वृत्तवाहिनीवरून देण्यात आली आहे. यामुळे इराणमधील वातावरण अधिकच तापले आहे. इराणमधील सैनिकांच्या परेडवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील कट्टरवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले होते. आता थेट सौदी आणि युएईवर क्षेपणास्त्र हल्ल्यांची धमकी देईपर्यंत या कट्टरवाद्यांची मजल गेली आहे.

“रिव्होल्युशनरी गार्ड’वरील व्हिडीओ संदेश प्रसारीत झाल्यानंतर लगेचच वेबसाईटवरून डिलीट करण्यात आला. इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयतोल्लाह अली खामेनी यांनी शनिवारी अहवाझ शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल रियाध आणि अबुधाबीला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यामध्ये 25 जण ठार झाले होते आणि 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इराणच्या न्यूज पोर्टलवरून दिल्या गेलेल्या धमकीमुळे संपूर्ण पर्शियन आखातामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडीओमध्ये पूर्वीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला दाखवला गेला. अबुधाबी आणि रियाधबरोबर या व्हिडीओतून इस्रायललाही धमकी दिली गेली आहे. इराणमधून अशाप्रकारे 2017 मध्ये तीनवेळा क्षेपणास्त्र हल्ल्यांची धमकी दिली गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)