अमेरिकेत मादक पदार्थांच्या तस्करीसाठी हॉटेलमधून 600 फूट बोगदा

वॉशिंग़्टन (अमेरिका): मादक पदार्थांच्या तस्करीसाठी अमेरिकेत माफियांनी एका हॉटेलमधून तब्बल 600 फूट लांबीचा बोगदा खणला असल्याचे उघडकीस आले आहे. ऍरिझोना प्रांतात पोलीसांनी हा बोगदा शोधून काढला आहे. एका हॉटेलच्या तळघरातून सुरू होणारा बोगदा सीमा पार करून मेक्‍सिकोत गेल्याचे आढळून आले आहे. मादक पदार्थांच्या तस्करीसाठीच याचा उपयोग केला जात होता. काही दिवसांपूर्वी या हॉटेलच्या मालकाला-इव्हॅन लोपेझ याला पोलीसांनी अटक केली होती.

लोपेझकडून 70 कोटी रुपये किमतीचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याच्या हॉटेलची झडती घेत असताना तळघरात 22 फूट खोलीवर असलेला हा 5 फूट उंचीचा आणि 3 फूट रुंदीचा बोगदा उघडकीस आला. या प्रकरणात अधिक तपास चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील सॅन डियागो येथे 2,000 फूट लांबीचा बोगदा सापडला होता. त्याचा उपयोगही मादक पदार्थांच्या तस्करीसाठी केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बोगदा अमेरिकेतील आजवरचा अशा प्रकारचा सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)