अमेरिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोचा गंडा

  • शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन विदेशी व्यक्‍तींवर गुन्हा दाखल

शिक्रापूर – सणसवाडी येथे राहणाऱ्या आणि इंटरनेटवरून नोकरी शोधणाऱ्या एका 23 वर्षीय युवकास इंटरनेटच्या माध्यमातून परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने बनावट व्हिजा, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्रे ई-मेल करून 3 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत ज्ञानेश्वर त्रिंबक वैद्य (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ राहणार जळगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी विदेशी रॉबर्ट नॉर्मन ऍडमिस्टन आणि स्कॉट ऍलेक्‍स यांच्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर वैद्य हा मे महिन्यात इंटरनेटच्या सहाय्याने (शाईन डॉट कॉम) या वेबसाईटवरून नोकरी शोधत होता. त्यावेळी त्याने त्याचा बायोडाटा त्यावर अपलोड केला. त्यांनतर त्याला अमेरिका देशातून एक ईमेल आयडी आला. अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी असून त्याबाबतचा फॉर्म ईमेल आयडीवर आला. तेव्हा वैद्य याने तो फॉर्म भरून पाठवून दिला असता त्याला त्याच्या ईमेल आयडीवर इंग्लंडमधील एका हॉटेलमध्ये नोकरी असून त्याबाबतचे शपथपत्र पाठवून व्हिजा, ऑफिसर स्कॉट ऍलेक्‍स यांचा ईमेल आयडी आला. त्यांनतर वैद्य याला नोकरीबाबत फोन आला. रॉबर्ट नॉर्मन ऍडमिस्टन यांनी वैद्य याला व्हिजा, पासपोर्ट, जॉईन लेटर, करारनामा यांसह इतर कागदपत्रांसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले.
त्यांनतर ज्ञानेश्वर वैद्य याने त्याला पाठविण्यात आलेल्या खात्यावर 21 मे रोजी प्रथम पंधरा हजार रुपये भरले. त्यांनतर त्याला स्कॉट ऍलेक्‍स याने फोन करून व्हिजासाठी 43 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनतर देखील वरील दोन्ही व्यक्‍तींनी वेळोवेळी सुमारे 3 लाख 75 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार वैद्य याने वेगवेगळ्या खात्यावर पैसे भरले. 25 जून रोजी स्कॉट ऍलेक्‍स यांनी अमेरिका देशाचा व्हिजा वैद्य याच्या ईमेलवर पाठवला. त्यावेळी आपल्याला विदेशात नोकरी लागली आहे, असे वैद्य याला वाटले. त्यांनतर वैद्य याने विदेशात जाऊन आलेल्या त्याच्या विशाल बनकर या मित्राला व्हिजासाठी किती पैसे लागतात, अशी विचारणा केली असता त्याने दिलेल्या माहितीनंतर त्याने त्याला व्हिजा मिळाला असल्याचे सांगितले. त्यावेळी विशाल याने वैद्यला आलेला व्हिजा त्याचे ओळखीच्या व्हिजा ऑफिसरला पाठविला असता तो व्हिजा बनावट असून त्या व्हिजा नंबरवर दुसऱ्या व्यक्तीचा व्हिजा असल्याचे ऑफिसर यांनी विशाल बनकर यांना सांगितले. त्यांनतर रॉबर्ट नॉर्मन ऍडमिस्टन आणि स्कॉट ऍलेक्‍स या दोघांनी विदेशात नोकरी लावतो, असे सांगून व्हिजा आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या बॅंक खात्यावर विविध रकमेने पैसे भरून घेऊन 3 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे ज्ञानेश्वर वैद्य याचे लक्षात आले. त्यांनतर वैद्य याने शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)