अमेरिकेची शांती योजना बिनबुडाची – पॅलेस्टाईन

संयुक्त राष्ट्र – अमेरिकेची शांती योजना बिनबुडाची असल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी 6 डिसेंबर रोजी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर अमेरिकेने राजकीय प्रक्रियेवर लक्ष ठेवणारा एकमेव देश असण्याचा आपला अधिकार गमावला आहे अशी प्रतिक्रिया पॅलेस्टाईनचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत रियाद मन्सूर यांऩी दिली आहे.

चर्चा होण्यापूर्वी, जिचा निर्णय अगोदरच घेण्यात आलेला आहे, अशी कोणतीही योजना स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास आणि अन्य पॅलेस्टिनियन नेत्यांनी दिले आहेत. अनेक दशकांपासूनचा इस्रायल -पॅलेस्टाईन संघर्ष मिटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न पॅलेस्टाईनला हवे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उलट अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅले यांनी, की पश्‍चिम आशियातील देश पॅलेस्टाईन जनतेच्या मदतीसाठी काहीही करत नाहीत असा आरोप केला आहे. ज्या वेळी सलोखा करण्याची आवश्‍यकता असते, तेव्हा अरब राष्ट्रे कोठे असतात असा प्रश्‍न निक्की हॅले यांनी केला. हजारो मैल दूर अंतरावरून पोकळ भाषण देण्यापेक्षा क्षेत्र्रीय देशांनी प्रत्यक्ष कृतीसाठी पुढे येण्याची आवश्‍यकता असल्याचे आपला शांती प्रस्ताव संयुक्त प्रस्ताव राष्ट्रात ठेवताना निक्की हॅले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)