अमेरिकेचा पाकिस्तानला दणका, संरक्षण मदतीत 80 टक्‍के कपात 

वॉशिंग्टन: 25 जुलै रोजी झालेल्या मतदानानंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली असताना आणि युती सरकार स्थापनेची तयारी चालू असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. अमेरिकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या संरक्षण मदतीत 80 टक्के कपात होंण्याचे संकेत आहेत. तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानला अमेरिकेकडून दर साल मिळणाऱ्या 70 कोटी डॉलर्सपैकी पुढील वर्षी केवळ 15 कोटी डॉलर्स एवढेच मिळतील. आणि ही मदत मिळण्यासाठीही पाकिस्तानला अनेक अटीची पूर्तता करावी लागणार आहे.
सन 2019चे संरक्षण खर्च विधेयक पुढील आठवड्यात राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्या सहीसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र पाकिस्तानला दर वर्षी देण्यात येणाऱ्या संरक्षण मदतीचा यात उल्लेखच नाही. हक्कानी नेटवर्क आणि आणि दहशतवाद्यांना आसरा न देण्यासाठी, त्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी अमेरिका ही मदत पाकिस्तानला देत असते. व्हाईट हाऊसचे पूर्व अधिकारी अग्नीश गोयल यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानची डबल पॉलिसी पाहून अनेक सांसद पाकिस्तानला दोस्तीच्या बुरख्यातील दुष्मन म्हणतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)