अमेरिकीच्या ३ हजार कर्मचाऱ्यांना भारतात ‘ही’ कंपनी देणार रोजगार

नवी दिल्ली :  येत्या पाच वर्षांमध्ये ३००० अमेरिकींना भारतात सॉफ्टवेअर क्षेत्रातली आघाडीची असणारी इन्फोसिस कंपनी रोजगार देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  कंपनीचे अध्यक्ष रवी कुमार यांनी याविषयी माहिती दिली. अमेरिकेमधील इंडियानापोलिस येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल परिसरात १४१ एकर जागेमध्ये हा कॅम्पस उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी २४५ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

एका इंग्रजी वर्तमानपत्रात याविषयी माहिती देण्यात आली आहे. या कॅम्पसमध्ये एक ‘टेकहब’ उभारण्यात येणार असून यात कंपनीचा डेटा आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी यांचा समावेश असेल. या ‘टेकहब’मध्ये इंजिनिअर्स, डेव्हलपर्स, विश्लेषक, आर्किटेक्टस आणि औद्योगिक सल्लागार यांच्या समावेश करण्यात येईल, रवी कुमार यांनी सांगितले. इंडियाना इकोनॉमिक डेव्हल्पमेंट कार्पोरेशननुसार, या प्रकल्पासाठी राज्य आणि शहरातून प्रोत्साहन मिळत असून तब्बल १०१.८ दशलक्ष रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार असून ही एक मोठी भागीदारी ठरणार आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यवसाय करण्याची दिशा बदलत असल्याचे गव्हर्नर एरिक होलकोम्ब यांनी सांगितले. हा प्रकल्प २००५ मध्ये सुरु करण्यात आला असून या प्रकल्पामुळे अनेक जणांना रोजगार मिळणार असल्याचेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)