अमेरिका आणि चीनदरम्यानची व्यापारविषयक चर्चा रद्द 

बीजिंग: अमेरिकेच्या 60 अब्ज डॉलर मूल्याच्या 5,207 वस्तूंवरील आयात करात चीनने आणखी 5 ते 10 टक्के करवाढ केली आहे. नवे कर लावताना चीनने म्हटले की, अमेरिका व्यापार क्षेत्रात दादागिरी करीत आहे. त्याला विरोध करण्याची गरज आहे. अमेरिकी प्रशासनाने चीनच्या 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर लादलेल्या कराची अंमलबजावणी परवा सुरू होताच चीनने ही प्रति कारवाई केली. यामुळे अमेरिकेच्या 110 अब्ज डॉलरच्या वस्तू वाढीव कराच्या आवाक्‍यात आल्या आहेत.
तडजोडीचा मार्ग म्हणून चीनने अमेरिकेकडून अधिकाधिक नैसर्गिक वायू खरेदी करून चीनच्या शिलकी द्विपक्षीय व्यापारात कपातीची तयारी दर्शविली. परंतु अमेरिकेने चीनचा हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावातून चीनने अंग काढून घेतले आहे. याआधी दोन्ही देशांच्या राजदूतांत 22 ऑगस्ट रोजी शेवटची चर्चा झाली होती. या कारणामुळे जागतिक शेअरबाजार निर्देशांकावर परिणाम होत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)