अमेरिकन शिष्टमंडळ सिंगापूर परिषदेची आखणी करण्यासाठी उत्तर कोरियात दाखल

प्योंगयांग : सिंगापूर येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 मे रोजी हो असलेल्या परिषदेसाठी तयारी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियात आले आहे. उत्तर कोरियाशी चर्चा करण्यात मोठा वाव असल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट नक्कीच होईल असे सांगण्यात येत आहे. किम जोंग उन आणि माझ्या बैठकीसाठी तयारी करण्यासाठी आमचे अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियात पोहोचले आहे असे ट्रम्प यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.

किम आणि ट्रम्प सिंगापूरमध्ये 12 जूनरोजी भेटतील. उत्तर कोरियाने मागिल आठवड्यात अचानक आपण या बैठकीत सामिल होणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुऴे ही बैठक होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.  पण त्यानंतर पुन्हा भूमिका बदलत आपण कोठेही आणि कधीही भेटण्यास तयार आहोत असे उत्तर कोरियाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांची भेट घेतली होती. त्यामुळे कोरियन द्वीपकल्पातून अण्वस्त्रे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी गेले होते. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते.

द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्च स्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला होताय उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)