अमित शाह यांना एएसएल सुरक्षा मिळणार, मोजक्या चार व्यक्तींमध्ये समावेश

नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह  यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ते काही मोजक्याच व्यक्तींच्या यादीत सामील झाले  ज्यांना एएसएल म्हणजे एडवांस सिक्योरिटी लिएज़निंग ची अतिरिक्त सुरक्षा सेवा मिळत आहे. याअगोदर अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा होती. इंटेलीजन्स ब्यूरो यांच्या सुरक्षाच्या दृष्टीने केलेल्या समीक्षेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ  करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.

या नवीन सुविधेमुळे अमित शाह ज्या ठिकाणाचा दौरा करणार आहेत तेथे सगळ्यात अगोदर एएसएलची टीम जाऊन पाहणी करेल आणि तेथील स्थानिक पुलिस पोलीस प्रशासनास सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचे पालन करण्यास सांगेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या सुरक्षा समीक्षेसाठी एक बैठक झाली होती. त्यात इंटेलिजन्स ब्यूरोने त्यांना उच्च धोका होऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या यादीत स्थान देत त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ  करण्याचे सांगितले होते. ज्या नंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. अमित शाह यांना राउंड क्लॉक सीआरपीएफची सुरक्षा कवच भेटतो. त्याच्या व्यतिरिक्त ३० कमांडर त्यांच्याभोवती असतात. त्याचबरोबर स्थानिक पोलीस देखील त्यांच्या सुरक्षेमध्ये असते.

एएसएल टीम फक्त राष्ट्रपति रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा कवर करते आहे. ज्यांच्या जीवाला धोका असतो त्यांना अनेक प्रकारची सुरक्षा दिली जाते ज्यामध्ये मसलन, एसपीजी, जे प्लस, जेड, वाई और एक्स कटेगरी ची सुरक्षा भेटते. वेळोवेळी यानाच्या सुरक्षेची समीक्षा होते आणि त्यांची सुरक्षा वाढवण्याचा आणि कमी करण्याचा त्यानंतर निर्णय होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)