अमांगल्य विचारांपासून मनाला दूर ठेवा

सचिन महाराज बेंडे ः पाऊत्का मंदिराचा वर्धापन उत्साहात
नगर – श्री क्षेत्र कोरठण खंडोबा ,पिंपळगाव रोठा येथे भंडारा डोंगराजवळील खंडोबा पालखी विसावास्थानावर बांधलेल्या पाऊत्का मंदिराचा दावडी निमगावच्या मंदिराचा पहिला वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाले
सकाळी व पूजा अभिषेक व महाआरती सुशीला व शंकर गायकवाड तसेच सरसा बाई व सुनील गायकवाड या दांपत्याच्या हस्ते करण्यात आला यावेळी अध्यक्ष एड पांडुरंग गायकवाड, रामदास मुळे , विश्‍वस्त किसन मुंढे , बन्सी ढोमे , अमर गुंजाळ , शांताराम खोसे , प्रदीप भाटे , बबन गायकवाड , खंडू सुपेकर यांच्यासह सर्व आजी-माजी विश्‍वस्त ग्रामस्थ , भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील सचिन महाराज बेंडे यांचे हरीकीर्तन झाले यावेळी ते म्हणाले मनाची निर्मळता म्हणजे तरी काय आहे तर दुजाभाव, द्वेष, मत्सर, अमांगल्य विचारांपासून मनाला दूर ठेवा . निर्मळ मन म्हणजे खळखळणारा झरा, मंद वेगाने वाहणारा वारा, चंद्राचा शीतल प्रकाश उगवत र्सूकिरणांचा उबदारपणा, अशा तऱ्हेची अनुभूती होय. म्हणजे मन शुद्ध, पवित्र द्वेषविरहित ठेवले की त्याचे उपद्रवमूल्य कमी तर होतेच पण स्वत:च्याही मनातील अस्वस्थता, अकारण चिंता भाव दूर होतात.
नंतर दुपारी समस्त गायकवाड, सुपेकर, चिकणे(सावरगाव-चिकणेवाडी), वलवे( नांदूर पठार) नरड (कासारे )यांचे तर्फे महाप्रसाद उपस्थित सर्व भाविकांना देण्यात आला , दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)