अमरनाथ यात्रेची सांगता

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीर मधील हिमालयच्या पर्वतराजीत असलेल्या अमरनाथ या तीर्थस्थळावर भरणाऱ्या अमरनाथ यात्रेची आज सांगता झाली. यंदाच्या यात्रेत एकूण 2 लाख 85 हजार भाविक सहभागी झाले होते. 28 जून रोजी सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप आज विधीवत पुजा आणि छडी मुबारकच्या आगमनाने झाला. यंदाच्या यात्रा काळात विविध कारणांनी एकूण 38 जणांना प्राणाला मुकावे लागले. खराब हवमान आणि नैसर्गिक कारणाने हे मृत्यू झाले आहेत.

गेल्या वर्षी एकूण 2 लाख 60 हजार भाविकांनी ही यात्रा केली होंती. यंदा त्यात सुमारे 20 हजारांची वाढ झाली. यात्रा काळात पुरवण्यात आलेल्या कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे तेथे अनुचित प्रकार घडू शकला नाही. यावेळी यात्रा मार्गावरील वाहनांसाठी प्रथमच रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग्स वापरण्यात आले होते त्यामुळे वाहनांचे लोकेशन सहज समजू शकत होते. यंदाच्या यात्रेसाठी विविध दलांचे एकूण चाळीस हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)