अभिषेक ऍक्‍टिंग थांबव…

अभिषेक बच्चनला मध्यंतरी एका सिनेविषयक परिसंवादामध्ये “गेस्ट स्पीकर’म्हणून बोलावले गेले होते. त्याच्या भाषणानंतर प्रेक्षकांमधून त्याला अनेक प्रश्‍न विचारले गेले होते. त्यापैकी बहुतेक प्रश्‍न “मनमर्जियां’मधील त्याच्या रोलशी संबंधित, त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाशी, अमिताभ -जया बच्चन यांचा अभिनेता मुलगा या नात्याशी संबंधित आणि बॉलिवूडमधील वशिलेबाजीशी संबंधित होते.

“मनमर्जियां’ बघितल्यावर ऐश्‍वर्याने त्याच्या ऍक्‍टिंगची तारीफ केली, असे त्याने याच प्रश्‍नांच्या उत्तरादरम्यान सांगितले. मात्र त्याने सांगितलेला मुंबईमध्ये एका थिएटरबाहेर घडलेला एक किस्सा भन्नाटच होता. त्यावेळी त्याचा “शरारत’ नुकताच रिलीज झाला होता. प्रेक्षकांच्या रिऍक्‍शन आजमावण्यासाठी अभिषेक थिएटरच्या गॅलरीमध्ये जाऊन बसला, पण एक बाई तिथे आली आणि तिने चक्क अभिषेकच्या कानाखाली वाजवली. “तू तुझ्या कुटुंबाचे नाव खराब करतो आहेस. ऍक्‍टिंग करणे थांबव.’ असे त्या बाईंनी त्याला सुनावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिषेकने हा किस्सा अगदी सहजपणे आणि खिलाडूवृत्तीने सांगितला खरा. पण त्याच्या फॅनचे त्याच्याबाबत अजूनही तसेच मत असावे. “मनमर्जियां’नंतर तरी त्याच्याबाबतचे हे मत बदलले असावे, असा अंदाज होता. मात्र त्या सिनेमात त्याची ऍक्‍टिंग चांगली होती, हे मत केवळ ऐश्‍वर्याचेच असावे. इतरांकडून तर काही वेगळाच रिप्लाय मिळतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)