अभियोग्यता चाचणीबाबत गुन्हा दाखल करण्याचे सचिवांचे आदेश

संग्रहित छायाचित्र

चाचणीतील माहिती नसल्याचेही सचिवांचे स्पष्टीकरण

पुणे – राज्यात होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणीचे गुण हे पैसे देऊन घेतले जात असल्याची एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर आता त्या संदर्भात बंडगार्डन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिले आहेत. तर पात्र-अपात्र उमेदवारांच्या आकडेवारीबाबत मला काहीही माहिती नाही, त्यामुळे याची माहिती तुम्ही परीक्षा परिषदेला किंवा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विचारा असे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

बंडगार्डन पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. ज्यांनी कोणी व्हिडिओ क्‍लिप तयार केली असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी तक्रार मी आजच दिली आहे. शिक्षण सचिवांनीच याबाबत आदेश दिले आहेत. दरम्यान परीक्षा परिषदेने कोणतीही परीक्षा घेतली नसल्याने त्यांच्याकडे आकडेवारी येण्याचा संबंधच नाही. जी काही आकडेवारी आहे ती आयटी विभागाकडून आलेली आहे.
सुखदेव डेरे, आयुक्‍त
राज्य परीक्षा परिषद

राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होणार असून त्यासाठी डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. राज्यात 1 लाख 71 हजार 348 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ही परीक्षा माहिती व जनसंपर्क विभागाकडून घेण्यात आली तर याची बैठक व्यवस्था परीक्षा परिषदेने केली होती. या परीक्षेत 141 ते 160 गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही माहिती संचालनालयाने 450 अशी दिली आहे तर परीक्षा परिषदेने 850 इतकी दिली आहे. दरम्यानच्या काळात पैसे देऊन होणारे प्रवेशसंदर्भातील ऑडिओ क्‍लिपही व्हायरल झाल्या. त्यामध्ये शिक्षण सचिवांचेही नाव घेण्यात आले होते. या एकूणच प्रकरणाबाबत उमेदवरांकडून चौकशीची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर सचिवांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान चाचणीतील गुणांच्या फरकाबाबत नंदकुमार यांना विचारले असता ते म्हणाले, अभियोग्यता चाचणीबाबत मला काहीच माहिती नाही. मला कसल्याच आकडेवारीची माहिती नाही. त्या परीक्षा या स्वतंत्र विभागामार्फत घेण्यात आल्यात. त्या विभागांनीच माहिती द्यावी. परीक्षा परिषदेद्वारे जर आकडेवारी जाहीर केली असेल तर परिषदेला या आकडेवारीबाबत सांगणे गरजेचे आहे. तसेच, त्या ऑडिओ क्‍लिपमध्ये काहीही तथ्य नाही. हे काही लोकांनी पैसे कमविण्यासाठी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)