अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर कॉंग्रेसच्या वाटेवर?

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपला वेगळा दबदबा निर्माण करणाऱ्या “बिग बॉस’ अर्थात महेश मांजरेकर यांच्या राजकिय कारकिर्दीला पुन्हा सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीला आता अवघे वर्ष उरलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर-पश्‍चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी कॉंग्रेसकडून गुरुदास कामत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी मांजरेकरांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीआधी आता मांजरेकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

महेश मांजरेकर हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर राज ठाकरे यांची साथ सोडून कॉंग्रेसचा “हात’ धरण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अशोक चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी महेश मांजरेकर आले तर त्यांचे पक्षात स्वागत असेल, असे प्रतिपादन एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. तसेच कॉंग्रेसशीच निगडीत सूत्रांचा हवाल्यानुसार मे महिन्यातच एका दिमाखदार सोहळ्यात मांजरेकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील असे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)